8 वर्षांच्या रेयानची कमाल, यूट्यूबचा उपयोग करुन 2.8 कोटी रुपयांची कमाई

8 वर्षांच्या रेयानची कमाल, यूट्यूबचा उपयोग करुन 2.8 कोटी रुपयांची कमाई

केवळ 8 वर्षाच्या रेयान काजी या मुलाने यूट्यूबचा उपयोग करुन 2.8 कोटी रुपये कमाई केली आहे (Ryan's World Ryan Toys Review).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Dec 19, 2019 | 6:51 PM

टेक्सास : केवळ 8 वर्षाच्या रेयान काजी या मुलाने यूट्यूबचा उपयोग करुन 2.8 कोटी रुपये कमाई केली आहे (Ryan’s World Ryan Toys Review). रेयानच्या या कमाईने तो सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत आला आहे. फोर्ब्स मॅगझीनने रेयानला यूट्यूब चॅनलपासून कमाई करणाऱ्यांच्या यादीत सर्वात वरती ठेवलं आहे (Ryan’s World Ryan Toys Review).

फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीनुसार रेयानने यावर्षी 26 मिलियन डॉलरची कमाई केली. 2018 मध्ये देखील रेयान व्हिडीओ तयार करुन कमाई करणाऱ्यांमध्ये वरच्या स्थानी होता.

रेयानच्या या धमाल कामगिरीमुळे त्याला ‘छोटा पॅकेट, बड धमाका’ असं म्हणणं वावगं ठरणार नाही. असं असलं तरी रेयानच्या या यशामागे त्याचे आई वडिलही आहेत. आई वडिलांच्या संकल्पनेनुसारच त्याने हे सर्व काम केलं. मात्र, यात रेयानच्या नैसर्गिक अभिनयाचा वाटा मोठा आहे. त्याच्या या सहज वावरामुळेच त्याचे व्हिडीओ सर्वाधिक पसंतीस उतरले आहेत. अॅनालिटिकल वेबसाईट सोशल ब्लेडनुसार रेयानच्या बहुतेक सर्व व्हिडीओंना 1 बिलियनपेक्षा अधिक व्यूव्हज असतात.

रेयान आपल्या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून खेळण्यांचे रिव्यू देतो. त्यांच्या व्हिडीओमध्ये तो संबंधित खेळणे बॉक्समधून काढण्यापासून तर ते खेळण्यापर्यंत त्याविषयी माहिती देतो. रेयानचे हे व्हिडीओ त्याचे आई वडिल यू-ट्यूबवर अपलोड करतात.

रेयान काजी म्हणजेच रेयान गौनच्या यू ट्यूब चॅनलचं नाव ‘रेयान वर्ल्ड’ असं आहे. हा चॅनल 2015 मध्ये तयार करण्यात आला. 2015 मध्येच या चॅनलचे 22.9 मिलियन सब्सक्राईबर्स झाले. रेयानच्या आई वडिलांनी सांगितलं, एक खेळण्याची जाहिरात पाहून एकदा रेयानने हट्ट केला की त्यालाही असा व्हिडीओ करायचा आहे. तेथूनच रेयानचा यूट्यूब चॅनल तयार करण्याची कल्पना पुढे आली. त्यानंतर त्यांनी रेयानचे व्हिडीओ बनवून अपलोड करण्यास सुरुवात केली. काही दिवसांमध्येच या व्हिडीओंना दर्शकांची पसंती मिळाली.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें