Palghar mob lynching | भाजपशी संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशीची मागणी; सचिन सावंत यांचा आरोप

"देशपातळीवर भाजप सत्तेत असलेल्या राज्यात साधूंच्या हत्या झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये तसेच कर्नाटकमध्ये तीन पुजाऱ्यांच्या हत्या झाल्या. तेथे मात्र भाजपची मंडळी गप्प बसतात, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.

Palghar mob lynching | भाजपशी संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशीची मागणी; सचिन सावंत यांचा आरोप
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 6:59 PM

मुंबई : “देशपातळीवर भाजप सत्तेत असलेल्या राज्यात साधूंच्या हत्या झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये तसेच कर्नाटकमध्ये तीन पुजाऱ्यांच्या हत्या झाल्या. तेथे मात्र भाजपची मंडळी गप्प बसतात, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली. तसेच, भाजपचा दांभिकपणा आणि धर्माचा राजकारणासाठी उपयोग करण्याची हीन मानसिकता असल्याचे सांगत त्यांनी भाजपचा निषेध केला. पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंगप्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी आज जनआक्रोस यात्रेचे आयोजन केले होते. मात्र, घराबाहेर पडताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली. (Sachin Sawant criticizes jbp on palghar mob lynching issue)

“एप्रिल 2020 मध्ये पालघरमधील गडचिंचले गावात साधूंच्या मॉबलिंचिंग प्रकरणात आतापर्यंत 225 जणांना अटक झाली आहे. यापैकी 154 जणांना हत्याप्रकरणी तर 75 जणांना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक झाली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असे असताना भाजप सात महिन्यांनी यावर पुन्हा राजकारण करत आहे.” असे सावंत म्हणाले आहेत.

भाजपच्या संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय

पालघर लिंचिंग प्रकरणात भाजपशी संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे. “डचिंचले गाव हा भाजपचा गड आहे. या गावात गेली दहा वर्षे भाजपचा सरपंच आहे. आरोपी क्रमांक 61 आणि 65 यांच्यासोबत अटक झालेले आरोपी हे भाजपचे आहेत,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला. तसेच, भाजपच्या संबंधित आरोपींना वाचवण्यासाठीच सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, राम कदम यांनी आज (18 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजता खार येथील आपले निवासस्थान ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं. राम कदम यांच्यासह 100 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. (BJP MLA Ram Kadam detained by Police)

संबंधित बातम्या :

पालघर हत्येच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरत होती : प्रवीण दरेकर

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा

(Sachin Sawant criticizes jbp on palghar mob lynching issue)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.