सलमान लग्नाआधीच होणार बाबा?

सलमान लग्नाआधीच होणार बाबा?

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान याच्या लग्नाबद्दल  बॉलिवूड कलाकारांमध्ये नेहमीच चर्चा सुरु असते. सलमानचे अनेक चाहते त्याला लग्न कधी करणार असं विचारतात. पण तो त्यावर उत्तरं देण्यास टाळाटाळ करतो. सलमानच्या लग्नाची बॉलिवूड कलाकारांप्रमाणे त्याच्या चाहत्यांनाही फार उत्सुकता आहे. मात्र सलमान आता लवकरच बाबा होणार आहे. बसला ना धक्का…हो पण हे खरं आहे.

सलमानला लहान मुलं फार आवडतात. लहान मुलांसाठी सलमानचे प्रेम अनेकदा प्रसारमाध्यमांद्वारे समोर आले आहे. सलमान हा सध्या लग्नासाठी तयार नसल्याने त्याने सरोगेसी पद्धतीने बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानची बहिण अर्पिता खानचा मुलगा अहिलसोबत तो अनेकदा फिरताना, खेळताना दिसतो. सलमानच्या सोशल मीडियावरुन अहिलसोबत खेळतानाचे अनेक व्हिडीओही व्हायरल झालेत. यावरुन त्याचे अहिलवर फार प्रेम असल्याचे जाणवते.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये सरोगेसी पद्धतीनं आई-वडील होण्याचा निर्णय अनेक कलाकारांनी घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, एकता कपूर, तुषार कपूर आणि सनी लियोनी यांनी सरोगेसी पद्धतीचा वापर केला आहे. त्यानंतर आता सलमानही सरोगेसीद्वारे बाबा होण्याचा निर्णय घेतला आहे.

एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल प्रश्न विचारल्यावर सलमान खानने मजेदार असं उत्तर दिले, “मी चांगला मुलगा आहे आणि चांगला वडील बनू शकतो. पण मी चांगला पती बनू शकलो नाही”.

दरम्यान, सलमान खानची पूर्व प्रेयसी कतरिना कैफ आणि ऐश्वर्या रायसोबत लग्न करण्यासाठी तयार होता. मात्र दोघांसोबतही सलमानचे रिलेशनशिप फार काळ टिकले नाही. सध्या सलमान युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. लवकर हे दोघेही विवाहबंधंनात अडकरणार असल्याचंही म्हटलं जात होते. पण या दोघांनी हे वृत्त खोटं असल्याचे जाहीर केले. सलमान खान याआधी संगिता बिजलानी, सोमी अली, कतरिना कैफ आणि ऐश्वर्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता.

Published On - 7:14 pm, Thu, 9 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI