सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही, राहुल गांधी फालतू : संभाजी भिडे

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे देशद्रोही, राहुल गांधी फालतू : संभाजी भिडे

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत, असं म्हणत शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide supports CAA and NRC) यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलं आहे.

सचिन पाटील

|

Dec 20, 2019 | 7:26 PM

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक देशद्रोही आहेत, असं म्हणत शिवप्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide supports CAA and NRC) यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचं समर्थन केलं आहे. या कायद्यामुळे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या कोट्यवधी भारतीयांना आनंद झाला पाहिजे, असं संभाजी भिडे म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते. (Sambhaji Bhide supports CAA and NRC)

आपला देश माणसांचा आहे, पण देशभक्तांचा नाही हे दुर्दैव आहे. स्वार्थ हाच ज्यांचा धर्म आहे, त्यांनी कायद्याला विरोध करत गालबोट लावण्याचा प्रयत्न करुन, नंगानाच सुरु केला आहे. तो देशद्रोह आहे, असं संभाजी भिडे म्हणाले.

देशभक्त असलेल्या कुठल्याही नागरिकाला या कायद्याचं कौतुक वाटेल. हे मागेच व्हायला हवं होतं. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी सुद्धा नागरिकता सुधारणा कायदा लागू करा अशी मागणी केली होती. त्याचा व्हिडोओही आता व्हायरल होतोय, असं भिडे यांनी नमूद केलं. शिवसेनेनं या कायद्याला विरोध केलेला नाही, करणार नाही,  शिवसेनेच्या भूमिकेबाबत गैरसमज पसरवला जातोय,  असं भिडे म्हणाले.

राहुल गांधींवर हल्लाबोल

संभाजी भिडे यांनी यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. “नाही त्या फालतू माणसाबद्दल विचार करून राष्ट्राने आपला वेळ वाया घालवू नये. ज्याला काही उंची नाही अशी माणसं राजकारणात आले हे देशाचं दुर्दैव आहे”, असा घणाघात भिडे यांनी केला.

नागरिकांच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री

देशात सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे (CAA). मात्र, या कायद्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात दिलं (CM Uddhav Thackeray on CAA).

“सर्वोच्च न्यायालयात हा कायदा योग्य की अयोग्य याबाबतचा निर्णय व्हायचा आहे. मी अनेकांशी बोलत आहे. मला भेटल्यानंतर अनेकांचे गैरसमज दूर होत आहेत. कोणत्याही समाजातील नागरिकाने भीती, गैरसमज बाळगू नये. महाराष्ट्रातील सलोखा कायम ठेवा”, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.

संबंधित बातम्या   

CAA Protest : प्रकाश आंबेडकर यांचं पृथ्वीराज चव्हाण यांना खुलं आव्हान

घाबरु नका, महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काच्या रक्षणासाठी राज्य सरकार समर्थ : मुख्यमंत्री 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें