कोणीही वंचित नसतं, जो वंचित म्हणेल तो बुझदिल, जय भीम फेस्टिव्हलमध्ये उदयनराजे गरजले!

कोणीही वंचित नसतं, जो वंचित म्हणेल तो बुझदिल, जय भीम फेस्टिव्हलमध्ये उदयनराजे गरजले!


सातारा : साताऱ्यात सुरु असलेल्या जय भीम फेस्टिव्हलचे उद्घाटन राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी उदयनराजेंनी वंचित बहुजन आघाडीवर जोरदार टीका केली. या कार्यक्रमाला अनेक दलिते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, “”वंचितचा नेमका अर्थ काय?हा मला प्रश्न पडतोय. या लोकशाहीत सर्वजण समान आहेत. कोणी कोणाला वंचित ठेवत नसतं. केवळ राजकारणासाठी याचा दुरुपयोग होतोय”.

याशिवाय जे लोक स्वत:ला वंचित समजतात, ते लोक माझ्या मते बुझदिल आहेत. कोणीही वंचित राहू नये. कोणाच्याही अधिकारावर गदा आणण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं उदयनराजे म्हणाले.

भविष्यात वंचित पेक्षा आपण आपल्या अधिकाराने कसे पुढे जाऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे, असं उदयनराजे भोसलेंनी नमूद केलं.

“निवडणुकीच्या काळात वंचित आघाडी निर्माण झाली. मला प्रश्न पडला वंचितचा नेमका अर्थ काय? आणि का वंचित? या लोकशाहीत प्रत्येकजण समान आहे. कोणी कोणाला वंचित ठेवत नसतं, सर्वजण समान आहेत. केवळ राजकारणासाठी प्रत्येकजण त्याचा दुरुपयोग करत असतात. जे लोक म्हणतात आम्ही वंचित आहोत, माझ्या हिशेबाने ते लोक फार बुझदिल आहे असं मी समजतो”, असं उदनयराजे म्हणाले.

VIDEO:

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI