‘अग्रलेखांच्या बादशाहा’ची लेखणी विसावली, ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश

नीलकंठ खाडिलकर यांच्या मार्मिक आणि सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच त्यांना 'अग्रलेखांचा बादशाह' अशी बिरुदावली मिळाली.

'अग्रलेखांच्या बादशाहा'ची लेखणी विसावली, ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर कालवश

मुंबई : ‘अग्रलेखांचा बादशाह’ अशी ओळख असलेले ‘नवाकाळ’ दैनिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ खाडिलकर यांचं निधन (Journalist Nilkanth Khadilkar passes away) झालं आहे. वयाच्या 85 व्या वर्षी मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. खाडिलकरांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

अंतिम दर्शनासाठी खाडिलकरांचं पार्थिव दुपारी 12 ते दोन दरम्यान नवाकाळ दैनिकाच्या गिरगावातील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर दुपारी तीन वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध राजकीय नेत्यांनीही खाडिलकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

‘दैनिक नवाकाळ’ या वृत्तपत्राचं संपादकपद नीलकंठ खाडिलकर यांनी 27 वर्ष सांभाळलं होतं. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. अर्थशास्त्र विषय घेऊन खाडिलकरांनी बीए ऑनर्स केलं होतं. ते ‘संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. नीलकंठ खाडिलकर यांचे ‘हिंदुत्व’ हे पुस्तक वाचक-समीक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

खाडिलकर यांच्या मार्मिक आणि सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला होता. त्यामुळेच त्यांना ‘अग्रलेखांचा बादशाह’ अशी बिरुदावली मिळाली.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपली लेखणी तळागाळातील लोकांसाठी वापरली. अग्रलेखांच्या जोरावर खाडिलकर यांनी ‘नवाकाळ’ला वेगळी उंची प्राप्त करुन दिली. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकारही होते. त्यांनी घेतलेल्या अनेक मुलाखती गाजल्या आहेत.

नीलकंठ खाडिलकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

भारत सरकारकडून पद्मश्री

महाराष्ट्र सरकारचा पत्रकारितेचा पहिला लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार (2008)

मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोनदा अध्यक्षपद

‘चौफेर’ कऱ्हाडतर्फे ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार (2011)

मराठी पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे पुरस्कार

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार (2017)

Journalist Nilkanth Khadilkar passes away

शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.जब्बार पटेल

Published On - 10:32 am, Fri, 22 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI