Photo : मँचेस्टर सिटी संघाचा हुकूमी एक्का, मॅराडोनाचा जावई, ढिगभर गर्लफ्रेंड

फुटबॉल खेळण्यासोबतच आपल्या अफेअर्ससाठी देखील हा खेळाडू बराच प्रसिद्ध आहे. मॅराडोनाच्या मुलीसोबत घटस्फोटानंतर आता तो एका 24 वर्षीय मॉडेलला डेट करत आहे.

1/5
sergio
फुटबॉलच्या इतिहासात महान खेळाडू मानल्या जाणाऱ्या दिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांचे नोव्हेंबर 2020 मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेकांना त्यांची छोटी मुलगी जियानिना मॅराडोनाचा पती हा प्रसिद्ध फुटबॉलपटू सर्जिओ अग्वॅरो होता हे माहित नाही.
2/5
Giannina Maradona
जियानिना आणि सर्जिओ यांचे 2008 साली लग्न झाले. मात्र चार वर्षांतच 2012 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्या दोघांनाही एक मुलगा असून बेंजामिन अॅग्वॅरो असे त्याचे नाव आहे.
3/5
sergio aguero manchester city
सर्जिओ हा अर्जंटिना संघाकडून फॉरवर्ड पोजिशनला खेळतो. तसेच तो मँचेस्टर सिटी या क्लबचा देखील सर्वांत यशस्वी खेळाडू मानला जातो. सर्जिओनो नुकतेच मँचेस्टर सिटी सोडणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा देत बार्सिलोना संघात जाणार असल्याचेही सांगितले.
4/5
sergio gf 2
सर्जिओ आपल्या फुटबॉल कारकिर्दीसह खाजगी आयुष्याबाबतही बराच प्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक अफेअर्सच्या चर्चा असून सध्या तो 24 वर्षीय मॉडेल सोफिया कैलजेटी हिला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे.
5/5
sergio gf
याआधी जियानिनासोबत घटस्फोटानंतर 9 वर्षांच्या काळातच तो गायिका करीना तेजेडा (Karina Tejeda), इटालियन मॉडेल जोए क्रिस्टफोली (Zoe Cristofoli),टीवी स्टार टेलर वार्ड (Taylor Ward) अशा काही प्रसिद्ध महिलांसोबत रिलेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली होती.