Shah Rukh Khan | वाढदिवसानिमित्ताने किंग खानला खास सरप्राईझ, जगातील उंच इमारतीवर शाहरुखचा जलवा!

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानने 2 नोव्हेंबरला आपला 55वा वाढदिवस साजरा केला. यावेळी चाहत्यांनी त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.

Shah Rukh Khan | वाढदिवसानिमित्ताने किंग खानला खास सरप्राईझ, जगातील उंच इमारतीवर शाहरुखचा जलवा!
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 7:37 PM

नवी दिल्ली: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan)2 नोव्हेंबरला आपला 55वा वाढदिवस साजरा केला. यावेळी चाहत्यांनी त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी मास्क वाटप केले तर, काहींनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले. शाहरुख खानने सर्व चाहत्यांचे आभार मानत सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून, तेथे त्याने कुटुंबीयांसह आपला वाढदिवस साजरा केला. शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त जगातील सर्वात उंच ‘बुर्ज खलिफा’ या इमारतीवर प्रकाशाच्या सहाय्याने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. (Shah Rukh Khan got special surprise on birthday at Dubai)

शाहरुख खानने इन्स्टाग्रामवर या सीनचा जबरदस्त फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर शाहरुखने एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. शाहरुखने लिहिले की, ‘जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वोच्च स्क्रीनवर स्वतःला पाहून आनंद झाला. माझा मित्र @mohamed_alabbar ने माझ्या पुढच्या चित्रपटापूर्वी मला सर्वात मोठ्या पडद्यावर जागा दिली आहे धन्यवाद आणि प्रेम… माझ्या मुलांना देखील हे पाहून खूप आनंद झाला आहे.’

शाहरुखसोबत करण जोहरही दुबईत

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफा येथे त्याचे नाव प्रकाशित झाले. त्यावेळी शाहरुख खान रोमँटिक शैलीत दिसत होता. यावेळी शाहरुख खानसोबत करण जोहरही होता. करण जोहरनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. शाहरुख खानने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दस सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे.

View this post on Instagram

Happy birthday @iamsrk !! Love you !! May the lights shine on forever …. ❤️❤️❤️

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्स एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह हॉस्टेल’ असे ठेवण्यात आले आहे. शंकर रमन हे या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात सान्या मल्होत्रा, विक्रांत मेस्सी आणि बॉबी देओल दिसणार आहेत.

या चित्रपटाची कथा उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित ही आहे. या चित्रपटाची कथा एका तरुण जोडप्याच्या अस्थिर प्रवासाविषयी आहे. या तरूण जोडप्याची आयुष्य जगण्यासाठीची धडपड सुरू आहे. प्रेम, मनोरंजन,गुन्हेगारी-थ्रिलर आदी मसाला या चित्रपटात आहे. शंकर रमन हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर असून, त्यांनी यापूर्वी ‘गुडगाव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

‘चित्रपटात ‘लव्ह हॉस्टेल’ हा केवळ आपल्या समाजाचाच नाही, तर आपल्या समस्या सोडविण्यावर प्रकाश टाकतो’, असे शंकर रमन म्हणाले.‘लव्ह हॉस्टेल’ हा चित्रपट गौरी खान, मनीष मुंद्रा आणि गौरव वर्मा निर्मित करणार आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म्स अंतर्गत हा चित्रपट तयार होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षाच्या सुरूवातीस सुरू होईल आणि त्याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

Vijay Raaz | ‘कौआ बिर्याणी’ फेम अभिनेता विजय राजवर विनयभंगाचा गुन्हा, गोंदियात अटक

Laxmii | अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित!

(Shah Rukh Khan got special surprise on birthday at Dubai)

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.