पुण्यातील जमीर शेख यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातून अव्वल

पुण्यातील जमीर शेख यूपीएससीमध्ये महाराष्ट्रातून अव्वल

पुणे : स्पर्धा परीक्षा पास करण्याची केवळ एक संधी हातात उरलेली असताना जेव्हा घवघवीत यश मिळतं तेव्हा कसा आनंद होतो त्याचा अनुभव जमीर मुनीर शेख हे घेत आहेत. यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएस परीक्षेत पुणे जिल्ह्यातील शिरुरमधील जमीर यांनी राज्यातून पहिला, तर देशात 18 वा क्रमांक मिळवलाय. जमीर यांच्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

तब्बल तीन वेळा स्पर्धा परीक्षेतील यशाने जमीर यांना हुलकावणी दिली. परंतु जमीर हे न डगमगता स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिले. अखेर तिसऱ्या प्रयत्नांमध्ये यांना यश मिळालं. जमीर शेख हे मूळ शिरुरचे आहेत. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होता. जमीर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून बी. टेकची पदवी घेतली. ही पदवी घेत असताना जमीर यांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच होता.

वाचाटाटाची नोकरी नाकारली आणि अभ्यास केला, यूपीएससीत राज्यात दुसरा क्रमांक

स्पर्धा परीक्षा देत असताना यश अवघ्या काही गुणांना तुम्हाला हुलकावणी देतं. त्यामुळे जमीर शेख हे विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देतात. ही परीक्षा देताना स्वतःची शिस्त आणि आत्मविश्वास या दोनच गोष्टी तुम्हाला यशापर्यंत नेतात, असा जमीर यांचा सल्ला आहे.

वाचाबापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं

जमीर शेख यांच्या मते, अभ्यासाची एक शिस्त पाहिजे. कारण, तुम्ही जेव्हा एक प्रशासकीय अधिकारी होता, तेव्हा तुम्हाला समोर लक्ष्य असतात आणि ते वेळेतच पूर्ण करायचे असतात. अभ्यासाचं एक नियोजन असेल तर काय होतं, त्याचं उदाहरण माझ्या रुपाने समोर आहे. स्वतःचं एक टार्गेट असेल तर मेंदू आपोआप काम करायला लागतो. मानसिक स्वास्थ्य सर्वात महत्त्वाचं आहे. त्यासोबतच शरीराची काळजीही घेतली पाहिजे. याशिवाय सर्वात मोठी एनर्जी म्हणजे सकारात्मकता.. ही गोष्ट कधीही सोडू नका, असं जमीर सांगतात.

वाचाबाप बँड वाजवत होता, मुलगा यूपीएससी पास झाल्याची बातमी आली

जमीर शेख यांना अनेकदा काही गुणांनी यशाने हुलकावणी दिली. यानंतर त्यांनी दिल्लीहून बंगळुरुला अभ्यासासाठी जाण्याचं ठरवलं. बंगळुरुत त्यांना सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन मिळालं ते विनय सरांचं. या यशाबद्दल सांगताना ते त्यांच्या मार्गदर्शकाबद्दलही सांगायला विसरत नाहीत. कारण, या प्रवासात मार्गदर्शन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असल्याचं जमीर सांगतात.

Published On - 8:16 pm, Fri, 8 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI