रणवीर-दीपिकाकडून लग्नाचे फोटो शेअर

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचा विवाहसोहळा इटलीत पार पडला. या सोहळ्याला अगदी मोजक्या लोकांना बोलावण्यात आले होते. शिवाय, लग्नाचे फोटोही कुठे शेअर करण्यात आले नव्हते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दीपिका आणि रणवीरने लग्नाचे फोटो ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत.   रणवीर-दीपिकाचं इटलीत लग्न बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका […]

रणवीर-दीपिकाकडून लग्नाचे फोटो शेअर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांचा विवाहसोहळा इटलीत पार पडला. या सोहळ्याला अगदी मोजक्या लोकांना बोलावण्यात आले होते. शिवाय, लग्नाचे फोटोही कुठे शेअर करण्यात आले नव्हते. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दीपिका आणि रणवीरने लग्नाचे फोटो ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत.

रणवीर-दीपिकाचं इटलीत लग्न

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी काल (14 नोव्हेंबर) कोकणी पद्धतीने लग्न केलं. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला लग्न सोहळा दुपारी 4.45 वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला केवळ 30 नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा समावेश होता.

दीपिका आणि रणवीरचे मोठ्या फौजफाट्यात लग्न झालं. यावेळी पाण्यातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे लग्न ठिकाणाला छावणीचं स्वरुप आले होते.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर यांचं लग्न झाल्याने सोशल मीडियावरुन दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें