“हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटता, मग सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”, अरविंद सावंत यांचा भाजपला सवाल

हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटता, मग सावरकरांना भारतरत्न का देत नाही?, अरविंद सावंत यांचा भाजपला सवाल

मुंबई : काल अनिल परब (Anil Parab) यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. अश्यात दोन्ही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. आज शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सावरकरांना भारतरत्न (Bharatratn Award) देण्यावरून भाजपला छेडलंय. “भाजप नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटतं, मग सावरकरांना (Savarkar) भारतरत्न का देत नाही?”, असा […]

आयेशा सय्यद

|

May 27, 2022 | 11:29 AM

मुंबई : काल अनिल परब (Anil Parab) यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. अश्यात दोन्ही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. आज शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सावरकरांना भारतरत्न (Bharatratn Award) देण्यावरून भाजपला छेडलंय. “भाजप नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटतं, मग सावरकरांना (Savarkar) भारतरत्न का देत नाही?”, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

अरविंद सावंत यांचा भाजपला सवाल

शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला प्रश्न विचारलेत. “भाजप नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटतं, मग सावरकरांना भारतरत्न का देत नाही?”, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे.

सावकरकरांचं कार्य पाहता त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना आणि भाजपच्या वतीने करण्यात येते. केंद्रात भाजपचं सरकार आहे तर मग हिंदुत्वावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या भाजपने त्यांना भारतरत्न द्यावा, अन् त्यांच्या कार्याचा गौरव करावा, असं शिवसेनेच्या वतीने बोलण्यात येतं.

ईडीच्या अधिकाऱ्यांवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. ईडीचा प्रवक्ता सांगतो की, “उद्या या व्यक्तीला अटक होणार आणि ती होते. पण जेव्हा याच माणसावर आरोप होतात. तेव्हा तो पळतो.” असं सावंत म्हणाले.

“मी जेव्हापासून राजकारणात आहे. शिवसेनेत सक्रीय आहे तेव्हापासून मी कधीही ऐवढ्या खालच्या स्तराचं राजकारण पाहिलं नाही. आम्ही मागची पाच वर्षे आपण सोबतच होतो ना? तेव्हा फडणवीसांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच नंतर पक्षात घेतलं. त्यांच्या पक्षात गेले की हे लोक दोषमुक्त झाले.पण जे गेले नाहीत, त्यांना आता प्रशासकीय यंत्रणेचा आधार घेत त्रास दिला जातोय”, असंही सावंत यांनी म्हटलंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें