बेड्सची माहिती लपवणाऱ्या पुण्यातील 25 रुग्णालयांना पालिकेकडून ‘कारणे दाखवा’

बेड्सची माहिती लपवणाऱ्या पुण्यातील 25 रुग्णालयांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटिस देण्यात आली (Pune Private Hospital) आहे.

बेड्सची माहिती लपवणाऱ्या पुण्यातील 25 रुग्णालयांना पालिकेकडून 'कारणे दाखवा'
पुणे महापालिका

पुणे : बेड्सची माहिती लपवणाऱ्या पुण्यातील 25 रुग्णालयांना महापालिकेकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली (Pune Private Hospital) आहे. कोरोनाच्या काळात काही रुग्णालयांनी रुग्णांकडून जादा पैसे आकारले आहेत. तर काही रुग्णालयांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली (Pune Private Hospital) आहे.

पुण्यातील जहांगीर रुग्णालयाला कोरोनाग्रस्त रुग्णांकडून जादा बिल आकारल्या प्रकरणी, तर जुपिटर रुग्णालयाला हलगर्जीमुळे रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने नोटीस देण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांची लूट होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. काही रुग्णालये बेड्सची माहिती लपवत असून रुग्णालयांकडून खाटा उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे अशाही रुग्णालयांना पालिकेने नोटीस बजावली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोरोना रुग्णांकडून जास्त बिल वसूल केले जात असल्याच्या पालिकेकडे तक्रारी येत होत्या. त्यानुसार मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी रुग्णालयांना नोटिसा बजावल्या. रुग्णालय व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तर न आल्यास कारवाईचा इशाराही अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

खाटांची माहिती देणे न देणे, उपचारात हलगर्जीपणा, रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर आता गुन्हेही दाखल होणार आहेत. तसे अधिकारही क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना आहेत.

“रुग्णालयातून दिल्या जाणाऱ्या माहितीची शहानिशा करण्यासाठी विविध विभागातल्या पंधरा अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारी रुग्णालयातील उपलब्ध खाटा, कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या खाटा, व्हेंटीलेटरची रुग्णालयाने दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील माहितीची दररोज खातरजमा करणार आहेत. तर जिल्ह्यातील कोरोना उपचारांसाठी किती खाटा उपलब्ध करून देणार, किती खाटा वाढणार याची माहिती रुग्णालयाने दुपारपर्यंत द्यावी”, असं आयुक्तांनी रुग्णालयांना सांगितले.

“खाटांची लपवालपवी केल्यास कडक कारवाई केली जाईल”, असा इशारा विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

PUNE CORONA | पुण्यात निवृत्त शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर न मिळाल्याने मृत्यू

पिंपरी चिंचवडमध्ये 56 ठिकाणी नाकाबंदी, तर 13 चेकनाके, कडकडीत लॉकडाऊनसाठी पोलीस सज्ज

Published On - 8:00 am, Thu, 16 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI