‘सीसीडी’चे संस्थापक आणि माजी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता

देशातील सर्वात प्रसिद्ध कॉफी रेस्टॉरंट अशी ओळख असलेल्या कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ (VG Siddhartha) मंगळुरुतून बेपत्ता झाले आहे.

'सीसीडी'चे संस्थापक आणि माजी परराष्ट्रमंत्री एस.एम.कृष्णा यांचे जावई व्ही. जी. सिद्धार्थ बेपत्ता


बंगळुरु : देशातील सर्वात प्रसिद्ध कॉफी रेस्टॉरंट अशी ओळख असलेल्या कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day) चे संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ (VG Siddhartha) मंगळुरुतून बेपत्ता झाले आहे. व्ही.जी सिद्धार्थ हे माजी मुख्यमंत्री आणि परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा (SM Krishna) यांचे जावई आहेत. सिद्धार्थ (VG Siddhartha) यांना शेवटचे नेत्रावती नदीजवळ दिसले होते. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले असून पोलिसांकडून सिद्धार्थ यांचा शोध सुरु आहे.

सिद्धार्थ यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्याच्या सुमारास सिद्धार्थ नदीजवळ गाडीतून उतरले. त्यानतंर त्यांनी ड्रायव्हरला मी लगेचच येतो असे सांगितले. यानंतर जवळपास अर्धा तास ड्रायव्हरने सिद्धार्थ यांची वाट पाहिली. मात्र 6.30 पर्यंत सिद्धार्थ न परतल्याने ड्रायव्हरने त्यांच्या कुटुंबियांना याबाबात सांगितले.

दरम्यान सध्या कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. बोटीच्या सहाय्याने पोलीस सिद्धार्थ यांचा नदीत शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी इतर आजूबाजूच्या ठिकाणीही चौकशी करत आहे.

पोलिसांनी सिद्धार्थ यांचे कॉल डिटेल्सचाही तपशीलाची तपासणीही केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा, काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार आणि बीएल शंकर हे एस. एम. कृष्णा यांच्या घरी पोहोचले आहेत.

दोन वर्षापूर्वी म्हणजेच 2017 मध्ये आयकर विभागाने सिद्धार्थ यांच्या कॉफीच्या रेस्टॉरंटवर छापेमारी केली होती. देशातील सर्वात जास्त कॉफीच्या बियांचा पुरवठा करणारी कंपनी म्हणूनही सीसीडीची ओळख आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI