तृप्ती देसाईंना चॅलेंज देणारी शिवसेना कार्यकर्ती पोलिसांच्या ताब्यात

मी तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी. ये, तुझ्या स्वागताची तयारी मी नगर शहरात करुन ठेवली आहे.’ असं स्मिता आष्टेकर म्हणाल्या होत्या.

तृप्ती देसाईंना चॅलेंज देणारी शिवसेना कार्यकर्ती पोलिसांच्या ताब्यात
अनिश बेंद्रे

|

Feb 18, 2020 | 2:07 PM

अहमदनगर : ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांना नगर जिल्ह्यात पाय ठेवून दाखवाचं, असं आव्हान देणाऱ्या शिवसेना कार्यकर्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्मिता आष्टेकर यांना अहमदनगर पोलिसांनी सुपा टोल नाक्याजवळ ताब्यात घेतलं.(Smita Ashtekar Detained by police)

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटण्यासाठी रवाना झाल्या होत्या. तेव्हा, शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी ‘नगरमध्ये येऊन दाखवाच’ असं आव्हान देसाईंना दिलं होतं.

तृप्ती देसाई अहमदनगरला येण्यापूर्वीच इंदोरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. परंतु नुसती माफी मागून काही होणार नाही, इंदोरीकरांवर गुन्हा दाखल व्हावा, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं देसाईंनी सांगितलं.

तृप्ती देसाई काय म्हणाल्या?

इंदोरीकर अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आमचं शिष्टमंडळ अहमदनगरच्या पोलिस अधीक्षकांना भेटणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे इंदोरीकरांची बाजू घेतात, हे दुर्दैवी आहे. बच्चू कडू हे महिला आणि बालकल्याण विकास विभागाचे राज्यमंत्री आहेत, हाच एक विनोद आहे. ते वारंवार महिलांचा अपमान करतात, अशी टीका तृप्ती देसाई यांनी ‘टीव्ही9’ शी बोलताना केली.

तृप्ती देसाई नगरला; ‘तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी, तुझी लायकी दाखवते’, शिवसेना कार्यकर्तीचं ओपन चॅलेंज

गुन्हा दाखल झाला की इंदोरीकरांना अटक करण्यात यावी. त्यांनी संपूर्ण महिलावर्गाची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल करावा. जर तसं झालं नाही, तर येत्या अधिवेशनात त्याविरोधात आंदेलन करणार, असा इशाराही तृप्ती देसाईंनी दिला.

स्मिता आष्टेकर यांनी देसाईंना शहरात पाय ठेवून दाखवाच, असं ओपन चॅलेंज दिलं होतं. मात्र शिवसेनेचे नगर शहर अध्यक्ष दिलीप सातपुते यांनी पत्रक काढून आष्टेकरांचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केलं.

स्मिता आष्टेकर काय म्हणाल्या होत्या?

‘कोण ती तृप्ती देसाई, माझ्या नगर जिल्ह्यात येणार आहे, असं मी ऐकलं. माझा तिला निरोप आहे, की बाई तू लवकर माझ्या गावचा रस्ता धर, मी तुझी आतुरतेने वाट बघतेय राणी. ये, तुझ्या स्वागताची तयारी मी नगर शहरात करुन ठेवली आहे.’ असं स्मिता आष्टेकर म्हणाल्या होत्या.

‘अगं बाई, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का? तू करुन काय राहिली आहेस. सगळा विषय सोडून टाक, सगळं राजकारण बाजूला ठेव. तू माझ्या शनि चौथऱ्यावर, दैवतांवर, महाराजांवर, हिंदू धर्मावर आक्षेप घ्यायला लागली आहेस, या सगळ्या गोष्टी तू चुकीच्या करायला लागली आहेस. तू आल्यावर तुला तुझी लायकी काय आहे, ते ही स्मिता अष्टेकर नगर शहरात त्याच शिवाजी पुतळ्याच्या खाली दाखवेल. स्मिता अष्टेकर आणि हिंदू महिला काय करु शकते हे तुला कळेल’ असा इशाराही अष्टेकरांनी दिला होता.

आम्ही कोणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्ही अहमदनगरमध्ये येणारच, असं उत्तर तृप्ती देसाई यांनी आष्टेकरांच्या आवाहनानंतर दिलं होतं.(Smita Ashtekar Detained by police)

पाहा व्हिडीओ :

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें