HATHRAS GANGRAPE | कायदा सुव्यवस्था सांभाळणारेच हतबल, नराधमांना फाशी द्या; अण्णा हजारे कडाडले

HATHRAS GANGRAPE | कायदा सुव्यवस्था सांभाळणारेच हतबल, नराधमांना फाशी द्या; अण्णा हजारे कडाडले

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हाथरस बलात्कार प्रकरणातील नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे. (social activist Anna Hazare on death of a gangrape victim of Hathras)

prajwal dhage

|

Oct 01, 2020 | 8:38 PM

अहमदनगर : हाथरसमधील सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त होतोय. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कायदा, सुव्यवस्था अपुरी पडत असल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.(social activist Anna Hazare on death of a gangrape victim of Hathras)

निष्क्रीय सरकार आणि व्यवस्थेचे कान टोचण्यासाठी देशातली यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली असल्याचं ते म्हणाले. ते म्हणाले की, “हाथरसमधील घटना देशासाठी शरमेची बाब आहे. देशात सध्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, ते अपुरे पडत आहेत.”

दोषींना फाशी देण्याची मागणी

बलात्कारासारखे अक्षम्य गुन्हे करणारे नराधम मानवतेसाठी कलंक असल्याचे ते म्हणाले. देशाच्या भव्य सांस्कृतिक वारशाचे उदाहरण देत त्यांनी भारताच्या ऋषीमुनींपासूनच्या परंपरांचा दाखला दिला. ते म्हणाले, “भारताची संस्कृती विश्वातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे. देशात अशा प्रकारचे गुन्हे घडणे ही खूप चिंताजनक बाब आहे.”

हेही वाचा – धक्कादायक ! देशात महिला अत्याचारात मोठी वाढ, दिवसाला सरासरी 87 बलात्काराच्या घटना

पुढे, उत्तर प्रदेशातील घटना अत्यंत दुर्दैवी आणि लाजीरवाणी असल्याचं सांगत, ही फक्त एका मुलीचीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेची हत्या असल्याचेही ते म्हणाले. तसेच बलात्कारासारखे गंभीर गुन्हे भविष्यकाळात घडू नयेत म्हणून नराधमांना फासावर लटकावण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेला राजकीय रंग चढल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जात असताना त्यांना रस्त्यातच अडवण्यात आलं. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचाही आरोप करण्यात येतोय. तर राहुल आणि प्रियंका गांधी यांना अडवल्याच्या निषेध म्हणून महाराष्ट्रातही निदर्शनं करण्यात आली. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन केलं.

संबंंधित बातम्या :

UP Gang Rape | यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Rahul Gandhi | उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

Hathras Gang Rape | उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी

(social activist Anna Hazare on death of a gang rape victim of Hathras)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें