सियाचिन आणि लडाखमध्ये सैनिकांचा कपडे आणि खाद्यपदार्थांसाठीही संघर्ष : कॅग

नियंत्रक आणि महालेखापालांनी (CAG) सोमवारी (3 फेब्रुवारी) सियाचिन आणि लडाखसारख्या अतिउंच भागात गोठवणाऱ्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी अत्यावश्यक कपडे आणि खाद्यपदार्थांच्या कमतरतेबाबत संसदेचं लक्ष्य वेधलं आहे (CAG report on Soldiers need).

सियाचिन आणि लडाखमध्ये सैनिकांचा कपडे आणि खाद्यपदार्थांसाठीही संघर्ष : कॅग
Follow us
| Updated on: Feb 04, 2020 | 8:23 AM

नवी दिल्ली : नियंत्रक आणि महालेखापालांनी (CAG) सोमवारी (3 फेब्रुवारी) सियाचिन आणि लडाखसारख्या अतिउंच भागात गोठवणाऱ्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी अत्यावश्यक कपडे आणि खाद्यपदार्थांच्या कमतरतेबाबत संसदेचं लक्ष्य वेधलं आहे (CAG report on Soldiers need). याबाबत कॅगने एक अहवालच संसदेत सादर केला. या अहवालात अत्यंत उंच भागात घालण्यासाठी आवश्यक कपडे आणि इतर उपकरणांच्या खरेदीसाठी 4 वर्षे उशीर झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यामुळे या ठिकाणी सैनिकांसाठी कपड्यांचा आणि इतर वस्तूंचा तुटवडा पडला आहे (CAG report on Soldiers need).

नोव्हेंबर 2015 ते सप्टेंबर 2016 दरम्यान बर्फाळ प्रदेशात वापरावयाच्या चष्म्यांचा तुटवडा 62 टक्क्यावरुन 98 टक्के झाला आहे. या काळात सैनिकांना बहुउपयोगी बूटही देण्यात आले नाही. माध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, मागील काळात जुन्या स्वरुपातील मास्क, जॅकेट आणि स्लीपिंग बॅगसारख्या गोष्टी खरेदी करण्यात आल्या. यामुळे सैन्याला अधिक आधुनिक गोष्टींपासून वंचित रहावं लागलं.

खाद्यपदार्थांच्या कमतरतेमुळे सैनिकांच्या कॅलरीग्रहणात 82 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे, असंही कॅगच्या (CAG) अहवालात म्हटलं आहे. कॅगने भारतीय राष्ट्रीय संरक्षण विश्वविद्यालयाच्या स्थापनेत होत असलेल्या दिरंगाईवरही लक्ष वेधलं आहे. याबाबत 1999 मध्येच कारगिल समितीने शिफारस केली आहे.

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.