अयोध्येतील मंदिरासाठी श्रीरामांची खास 10 फुटी ग्लास म्युरलची छबी, अहमदनगरच्या कलाकाराची विशेष कलाकृती

अयोद्धेतील राम मंदिरासाठी एक विशेष कलाकृती तयार केली जात आहे. याचा मान अहमदनगरचे कलाकार हेमंत दंडवते यांना मिळाला आहे (Special Glass art of Shriram for Ayodhya).

अयोध्येतील मंदिरासाठी श्रीरामांची खास 10 फुटी ग्लास म्युरलची छबी, अहमदनगरच्या कलाकाराची विशेष कलाकृती
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 1:45 PM

अहमदनगर : अयोद्धेतील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी होत आहे. त्याचसोबत राम मंदिरातील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीवरही बारकाईने लक्ष दिलं जात आहे. अशाचप्रकारे अयोद्धेतील राम मंदिरासाठी एक विशेष कलाकृती तयार केली जात आहे. याचा मान अहमदनगरचे कलाकार हेमंत दंडवते यांना मिळाला आहे (Special Glass art of Shriram for Ayodhya). त्यांनी तब्बल 2 महिने खर्च करुन श्रीरामांची खास ग्लास म्युरलमध्ये छबी तयार केली आहे. ती लवकरच अयोध्येला पाठवली जाणार आहे.

अहमदनगर येथील कलाकार हेमंत दंडवते यांनी 300 काचेच्या तुकड्यांपासून श्रीरामांची 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद प्रतिकृती तयार केली. यासाठी त्यांना जवळपास 2 महिने कालावधी लागला. या विशेष कलाकृतीवर प्रकाश प्रभाव टाकून सजावटही केली जाणार आहे. अयोध्याला राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर ही ग्लास म्युरलमध्ये साकारण्यात आलेली श्रीरामांची प्रतिकृती मंदिर परिसरात लावण्यात येणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

याविषयी बोलताना हेमंत दंडवते म्हणाले, “मला ही छबी साकारायला मिळतेय हेच माझं नशीब आहे. या ग्लासवरील प्रभु रामचंद्राच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न आणि विलोभनीय आहे. हे दुर्मिळ काच म्युरल निश्चितच अयोध्या मंदिराची शोभा वाढेल, असा मला विश्वास आहे.”

आतापर्यंत त्यांनी अनेक व्हीआयपी व्यक्तींच्या काचेच्या तुकड्यांपासून प्रतिकृती साकारल्या. तसेच काच कलाक्षेत्रात स्टेन ग्लास, एअर बुकिंग, टीचिंग, एनग्रेविंग, ऑसिड टेक्टर इत्यादी अवघड काच कलाकृती दंडवते साकारतात. इतर माध्यमापेक्षा ही कला किचकट, आव्हानात्मक आहे. ती साकारताना हाताला काचेने कापणे, इजा होणे विविध टेक्श्चरसाठी काचेवर रासायनिक प्रक्रियेने हात भाजणे, काच नाजूक असल्याने हाताळताना कलाकृतीची तुटफुट होणे इत्यादी अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय या कलेत पूर्ण आकाराचे ग्लास म्युरल व्यक्तिचित्र साकारणे आव्हानात्मक आणि अवघड आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

अशा स्थितीत दंडवते यांनी अभ्यास करुन आराखडा, चित्र टेखाटन, फामा कटिंग, आरसा तुकडा कटिंग, चॅम्प पॉलिश, एसिड टेक्सचर, अल्ट्रा व्हायलेट लाईट विशिष्ट ग्लुद्वारे पेस्टिंग केले आहे. हे काच म्युरल काम करताना खूपच विलक्षण अनुभव येत आहे, असं दंडवते यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :

एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित नाही, अनिल परब यांचे स्पष्टीकरण

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन दहा दिवसांवर, नागपुरातून पवित्र माती आणि पाणी रवाना

Special Glass art of Shriram for Ayodhya

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.