SSC Result 2020 | गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत कशी मिळवाल?

परीक्षेतील निकालावर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीपासूनच गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे (SSC Result recheck and answer copy).

SSC Result 2020 | गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत कशी मिळवाल?
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 12:48 AM

पुणे : अखेर बहुप्रतिक्षित दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (29 जुलै) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षेतील निकालावर समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाने दुसऱ्या दिवशीपासूनच गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्याची व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे (SSC Result recheck and answer copy).

निकालातील गुणांची पडताळणी करु इच्छिणाऱ्या किंवा आपल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागवण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच 30 जुलैपासून गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिका छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर विभागाकडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज विद्यार्थी स्वतंत्रपणे करु शकतात आणि विद्यार्थ्यांच्यावतीने शाळा देखील हा अर्ज करु शकतात.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

गुणपडताळणीच्या अर्जाची मुदत

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलैपासून ते 8 ऑगस्टपर्यंत असणार आहे. तर छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंतची मुदत असेल.

अर्जाचं शुल्क कसं भराल?

गुणपडताळणी किंवा छायप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरता येणार आहे. यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करता येईल.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं बंधनकारक असणार आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यलयीन कामाच्या 5 दिवसांमध्ये गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे. तसेच www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

मार्च 2020 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावीच्या परीक्षेत सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीच्या केवळ दोनच संधी असणार आहे, अशी माहिती राज्यमंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

SSC Result 2020 | दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

MSBSHSE SSC Result 2020 | दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहाल?

SSC Results | बारावीचा निकाल जाहीर, आता दहावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात…. 

SSC Result recheck and answer copy

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.