भाजपची अख्खी फौज जालन्यात एकवटणार

जालना : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या गोटातही खलबतं सुरु झाली आहेत. अशातच जालना जिल्ह्यात आज भाजपच्या भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजपची अख्खी फौज जालन्यात एकवटणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक […]

भाजपची अख्खी फौज जालन्यात एकवटणार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:34 PM

जालना : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या हालचाली वेगवान केल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या गोटातही खलबतं सुरु झाली आहेत. अशातच जालना जिल्ह्यात आज भाजपच्या भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील भाजपची अख्खी फौज जालन्यात एकवटणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरेल.

कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेबाबत भाजपच्या या कार्यसमितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करुन बैठकीला सुरुवात होईल.

कोण कोण उपस्थित राहणार?

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे
  • राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री
  • राज्यातील सर्व खासदार
  • सर्व आमदार
  • प्रदेश पदाधिकारी
  • जिल्हाध्यक्ष
  • सरचिटणीस
  • प्रदेश कार्यसमितीसाठी अपेक्षित पदाधिकारी

..म्हणून बैठकीला मोठं महत्त्व

लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे मुख्यमंत्र्यांना कळवल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीला अत्यंत महत्त्व आले आहे. आता या बैठकीत निवडणुकांसोबतच आणखी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा – तयारीला लागा, लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : सूत्र

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें