रमजान पवित्र, दहशतवाद विरोधी मोहीम थांबवा : मुफ्ती

श्रीनगर : रमजान दरम्यान काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी कारवाया थांबवा, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्तींनी केली. शनिवारी पत्रकार परिषद घेत मुफ्तींनी ही मागणी केंद्र सरकार आणि सुरक्षा दलाकडे केली. रमजान दरम्यान काश्मीरच्या लोकांना शांती मिळावी आणि पवित्र रमजान महिन्यात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले आणि सर्च ऑपरेशनसारख्या हिसंक कारवाया […]

रमजान पवित्र, दहशतवाद विरोधी मोहीम थांबवा : मुफ्ती
Mehbooba Mufti
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

श्रीनगर : रमजान दरम्यान काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद विरोधी कारवाया थांबवा, अशी मागणी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्तींनी केली. शनिवारी पत्रकार परिषद घेत मुफ्तींनी ही मागणी केंद्र सरकार आणि सुरक्षा दलाकडे केली.

रमजान दरम्यान काश्मीरच्या लोकांना शांती मिळावी आणि पवित्र रमजान महिन्यात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले आणि सर्च ऑपरेशनसारख्या हिसंक कारवाया केल्या जाऊ नये, यासाठी मुफ्तींनी पत्रकार परिषद घेत आपली मागणी सरकारसमोर मांडली. याशिवाय मेहबूबा यांनी दहशतवाद्यांनाही रमजान दरम्यान सुरक्षा दलावर कोणताही हल्ला करु नये, असं आवाहन केलं आहे.

“रमजानचा महिना लवकरच सुरु होत आहे. या संपूर्ण महिन्यात लोक नमाज पडतात आणि मशिदीत जातात. अशावेळी काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया थांबवाव्यात,गेल्यावर्षी मी मुख्यमंत्री असताना काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमा थांबवण्यात आल्या होत्या”, असं मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या.

दहशतवाद्यांना मेहबूबा मुफ्तींचे आवाहन

रमजान दरम्यान मुफ्तींनी सुरक्षा दलाशिवाय दहशतवाद्यांनाही हल्ले न करण्याचे आवाहन केले आहे. रमजानचा महिना हा पवित्र महिना असतो. यामुळे या महिन्यात कोणता दहशतवादी हल्ला करु नका, असही मुफ्तींनी यावेळी सांगितले.

मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्री असताना गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये रमजान महिन्यात दहशतवाद विरोधी मोहिम थांबवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये ही मोहिम थांबवल्यानंतरही दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर हल्ले करण्यात आले होते. तसेच दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिकांनाही त्यावेळी निशाणा बनवले होते.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.