अयोध्येत राम मंदिरच, सुप्रीम कोर्टाने तब्बल 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या!

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्या प्रकरणातील सर्व 18 पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या (review petitions dismissed in Ayodhya case judgment) आहेत.

अयोध्येत राम मंदिरच, सुप्रीम कोर्टाने तब्बल 18 पुनर्विचार याचिका फेटाळल्या!
Follow us
| Updated on: Dec 12, 2019 | 5:01 PM

नवी दिल्ली :  सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्या प्रकरणातील सर्व 18 पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या (review petitions dismissed in Ayodhya case judgment) आहेत. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने बंद चेंबरमध्ये सुनावणी घेऊन, सर्व याचिका फेटाळल्या. त्यामुळे अयोध्येत राम मंदिरच (review petitions dismissed in Ayodhya case judgment)होणार हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. पुनर्विचार याचिकांपैकी 9 याचिका पक्षकारांकडून तर 9 याचिका अन्य व्यक्तींनी दाखल केल्या होत्या. या याचिकांच्या मेरिटबाबतही विचार करण्यात आला होता.

यापूर्वी निर्मोही आखाड्याकडून पुनर्विचार याचिका दाखल कऱण्यात आली होती. आपल्या याचिकेत निर्मोही आखाड्याने, अयोध्या निर्णयाच्या एक महिन्यानंतरही राम मंदिर ट्रस्टने आपली भूमिका निश्चित केली नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे कोर्टाने याबाबत स्पष्ट आदेश द्यावे, असं नमूद करण्यात आलं होतं. पण आता कोर्टाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.

घटनापीठ

सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्यासह न्यायमूर्ती चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी याप्रकरणाची सुनावणी केली. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे या घटनापीठात नवे होते. न्यायमूर्ती रंजन गोगोई निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी संजीव खन्ना घटनापीठात होते.

सुप्रीम कोर्टाचा निकाल

सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) मंदिर-मशीद वादावर 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निर्णय दिला. तत्कालिन सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) . हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

संबंधित बातम्या  

Ayodhya verdict : अयोध्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचे 20 महत्त्वाचे मुद्दे 

Ayodhya verdict ASI Report : अयोध्या निकाल : सुप्रीम कोर्टाने संदर्भ दिलेल्या दस्ताऐवजात नेमकं काय?  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.