‘या’ कारणामुळे सुष्मिता सेन बॉलिवूडपासून लांब

'या' कारणामुळे सुष्मिता सेन बॉलिवूडपासून लांब

माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेकवर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. सुष्मिताने 2010 मध्ये ‘नो प्रोब्लेम’ या हिंदी चित्रपटात काम केले होते. यानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता.

सचिन पाटील

| Edited By: Namrata Patil

Jun 04, 2019 | 6:21 PM

मुंबई : माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेकवर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. सुष्मिताने 2010 मध्ये ‘नो प्रोब्लेम’ या हिंदी चित्रपटात काम केले होते. यानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर एका बंगाली चित्रपट ‘निर्बाक मध्ये ती झळकली होती. पण तिच्या बॉलिवूडच्या चाहत्यांना काही ती पुन्हा पडद्यावर दिसली नाही. अनेक चाहते सुष्मिताला तुमचा पुढचा चित्रपट कोणता, तुम्ही हल्ली सिनेसृष्टीत दिसत नाही असे प्रश्न विचारतात. त्यावर तिचं एकच उत्तर असतं, ते म्हणजे अलीषा…

काही वर्षांपूर्वी तिने अलीषाला दत्तक घेतले होते. सुष्मिताला आपल्या मुलीसोबत काही खास क्षण घालवायचे आहेत. म्हणूनच सुष्मिताने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला.

मला माहित आहे, “माझे सर्वात चांगले दिवस माझ्या तरुण वयात होते. तिथे मी चित्रपट करु शकते आणि तरुण दिसू शकते. जर मी चित्रपट नाही केला आणि मुलांकडे लक्ष दिले, तर मला पश्चाताप होईल का? किंवा मग जर मी अलीषाला निवडले आणि चित्रपट नाकारले असते, तर मला पश्चाताप जास्त पश्चाताप होईल,” असे प्रश्न मी माझ्या मनाला विचारले. मुलीला दत्तक घेतल्यानंतर सुष्मिता चित्रपटात व्यस्त असायची आणि त्यामुळे मुलीला वेळ देता येत नव्हता. यामुळे  सुष्मिताने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्याचं तिने स्पष्ट केलं.

मला त्याचं पहिलं पाऊल, पहिला शब्द गमावून बसायचं नाही, जसे मी रेनेच्या दरम्यान गमावून बसली होती. मला त्यांची व्यक्तिमत्वात बदल होताना पाहायचे आहे. मी माझ्या मुलांना स्पॉन्सर केले नाही. मी आई बनली. यामध्ये खूप अंतर आहे. रेनेच्यावेळी मी विचार केला की, मला पैसे कमवायचे आहे, मला बील भरायचे आहे. तेव्हा माझे आई बनण्यासाठी माझा दृष्टीकोन वेगळा होता.

सुष्मिता सेन आपल्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम करते तसेच ती त्यांच्या खूप जवळ असते. मुलींसोबत ट्रिपला गेलेले सर्व फोटो ती इन्स्टग्रामवर शेअर करते.

View this post on Instagram

#cherished #memories #thegang ?❤️ @rohmanshawl @rajeevmasand ??❤️I love you guys!!!!???

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47) on

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें