10 हजार ड्रेस, 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 11 टीव्ही, 10 फ्रीज, जयललितांची मालमत्ता ताब्यात

जयललिता यांचे तमिळनाडू आणि देशभरात लाखो चाहते आहेत (Tamil nadu government listed jayalalithaa properties including 4 kg gold above 8376 books)

10 हजार ड्रेस, 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 11 टीव्ही, 10 फ्रीज, जयललितांची मालमत्ता ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 5:55 PM

चेन्नई : तमिळनाडू सरकारने राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमकेच्या दिवंगत पक्षप्रमुख जे. जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातून 4 किलो सोनं, 610 किलो चांदी, 8 हजार 376 पुस्तकं, 38 एअर कंडीशनर आणि 10 हजार 438 ड्रेस ताब्यात घेतले आहेत. (Tamil nadu government listed jayalalithaa properties including 4 kg gold above 8376 books).

तमिळनाडू सरकार जयललिता यांचं स्मारक तयार करणार आहे. जयललिता यांचे तमिळनाडू आणि देशभरात लाखो चाहते आहेत. या चाहत्यांसाठी तमिळनाडू सरकार जयललिता यांच्या स्मारकात काही वस्तू प्रदर्शनासाठी ठेवणार आहे. त्यामुळेच सरकारने जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातून काही महत्त्वपूर्ण वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. सरकार त्या सर्व वस्तू जयललिता यांच्या स्मारकात प्रदर्शनासाठी ठेवणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

तमिळनाडू सरकार जयललिता यांचं ‘वेदा निलयम’ या तीनमजली घराचं रुपांतर स्मारकात करणार आहे. जयललिता यांच्या दिवंगत आईने हे घर विकत घेतलं होतं. या स्मारकात प्रदर्शनदेखील असणार आहे. जयललिता यांच्या ‘पोएस गार्डन’ या निवासस्थानातील बऱ्याच वस्तू प्रदर्शनात ठेवल्या जाणार आहेत.

तमिळनाडू सरकारने जयललिता यांच्या घरातून सोनं, चांदी, पुस्तकं आणि कपड्यांव्यतिरिक्त अनेक वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये 11 टीव्ही, 10 रेफ्रिजरेटर, 29 मोबाईल आणि टेलिफोन, 394 स्मृतीचिन्ह, 65 सूटकेस, 108 कॉस्मेटिक वस्तू, सहा घड्याळ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर दोन आंब्याची झाडे, पाच नारळाची आणि केळीच्या झाडांचादेखील यात समावेश आहेत.

तमिळनाडू सरकारच्या या अधिग्रहणाला जयललिता यांच्या कायदेशीर वंशजांनी विरोध केला आहे. जयललिता यांचा पुतना दीपक आणि पुतनी दीपा यांनी राज्य सरकारचा विरोध केला आहे. मात्र, तरीही तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी जयललिता यांच्या निवासस्थानाचं रुपांतर स्मारकात व्हावं यासाठी निवासस्थान सरकारच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते.

राज्यपालांच्या अध्यादेशानंतर मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांच्या नेतृत्वात जयललिता मेमोरियल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फाउंडेशनचे उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वमसह इतर मंत्री सदस्य आहेत (Tamil nadu government listed jayalalithaa properties including 4 kg gold above 8376 books).

तमिळनाडू सरकारने ‘वेदा निलयम’ मिळवण्यासाठी 25 जुलै रोजी सिव्हिल कोर्टात 67.9 कोटी रुपये जमा केले. यापैकी 36.9 कोटी रुपये आयटी आणि कराच्या थकबाकीसाठी दिले जातील. तर उर्वरित रक्कम जयललितांच्या कायदेशीर वंशजांना दिले जाऊ शकतात.

हेही वाचा : Sushant Rajuput case | पाटणा पोलीस कोटक बँकेत, तपास CBI नव्हे तर मुंबई पोलिसांकडेच

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.