तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर नागपुरात टँकर लॅाबी सक्रिय, ऐन हिवाळ्यात टँकरसाठी निविदा

तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर नागपुरात टँकर लॅाबी सक्रिय, ऐन हिवाळ्यात टँकरसाठी निविदा

तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर टँकर लॅाबी सक्रिय झालीय.| Tanker Lobby Tukaram Mundhe

Yuvraj Jadhav

|

Nov 25, 2020 | 2:05 PM

नागपूर: आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढेंची नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावरुन बदली झाल्यानंतर टँकर लॅाबी सक्रिय झाली आहे. नागपुरात ऐन हिवाळ्यात टँकरसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. नागपूर मनपा प्रशासनाने याबाबत निविदा काढल्या आहेत. (Tanker lobby active in Nagpur after transfer of Tukaram Mundhe)

तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांनी नागपुरातील मनपाचे 120 टँकर बंद केले होते. पण, आता टँकर लॅाबी पुन्हा सक्रिय झालीय. आर्थिक संकटात असतानाही नागपूर महानगरपालिका प्रशासनाने ऐन हिवाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. मालमत्ता कर वसूली न झाल्याने मनपाच्या उत्पन्नात मोठी घट झालीय. विकास कामांवरंही त्याचा परिणाम झाला आहे. या स्थितीतही ऐन हिवाळ्यात मनपा प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

नागपूर शहरातील सीमावर्ती भागात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा वापर केला जातोय. महापालिकेच्या सेवेत यापूर्वी 346 टँकर्स होते. टँकर चालक महापालिकेकडून पैसे घेत होते आणि पाणी बांधकामासाठी विकत असल्याच्या तक्रारी होत्या. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्च 2020 मध्ये 346 पैकी 120 टँकर्स बंद करून टँकर लॉबीला धक्का दिला होता. (Tanker lobby active in Nagpur after transfer of Tukaram Mundhe)

तुकाराम मुंढेच्या निर्णयामुळे 10 कोटींची बचत

तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या 120 टँकर बंद करण्याच्या निर्णयामुळे मनपाची दर महिन्याला 10 ते 11 कोटींची बचत झाली होती. पण, आता ऐन हिवाळ्यात मनपा प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी निवीदा काढलीय. नॅान नेटवर्क भागात पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची गरज आहे, असं यावेळी स्थायी समिती सभापती पिंटू झलके म्हणाले. (Tanker lobby active in Nagpur after transfer of Tukaram Mundhe)

सप्टेंबरमध्ये तुकाराम मुंढेंची बदली

तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदापवरुन सप्टेंबर महिन्यात बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या बदलीविरोधात नागपूरमधील सर्वसामान्य जनता आक्रमक झाली होती. तुकाराम मुंढेंची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथे सचिव म्हणून बदली झाली. तर त्यांच्या जागी राधाकृष्णन बी. यांनी नागपूरच्या नवीन मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिका आयुक्त म्हणून कडक निर्बंध आणल्याचे दिसत होते. मात्र,यावरुनच महापौर आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी मुंढे यांचे तीव्र मतभेद पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या:

तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Tukaram Mundhe| तुकाराम मुंढे मुंबईला रवाना, नागपुरात समर्थकांची घोषणाबाजी, बदलीविरोधात चीड

तुकाराम मुंढेंचे अर्धवट राहिलेले ‘ते’ काम नागपूरचे नवे पालिका आयुक्त नेणार तडीस

(Tanker lobby active in Nagpur after transfer of Tukaram Mundhe)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें