कल्याणमध्ये नराधम शिक्षकाकडून सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लौंगिक छळ

सहा अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Teacher Sexual Molestation on student) आहेत.

कल्याणमध्ये नराधम शिक्षकाकडून सहा अल्पवयीन विद्यार्थिनींचा लौंगिक छळ

ठाणे : सहा अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैगिंक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Teacher Sexual Molestation on student) आहेत. कल्याण मोहने परिसरात ही घटना घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा प्रशासनाने नराधम शिक्षक विजय मेटकरला सेवेतून बडतर्फ (Teacher Sexual Molestation on student) केले आहे.

शिक्षक विजय मेटकर हा काही महिन्यांपासून शाळेतील विद्यार्थिंनींवर लैगिंक अत्याचार करत होता. हा घडलेला प्रकार एका मुलीने आपल्या आईला सांगितल्यावर तो उघडकीस झाला. मेटकर याने एकाच मुलीसोबत लैगिंक अत्याचार केला नसून तब्बल सहा मुलींसोबत असा प्रकार केल्याचे समोर आले आहे. मुलींनी हा प्रकार कोणाला सांगू नये त्यासाठी तो विद्यार्थिनींना ब्लॅकमेल सुद्धा करीत होता.

शाळेतील शिक्षक मुलींसोबत हे कृत्य करीत होता. ही बाब समोर येताच शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी शाळेतील सर्व मुलींच्या पालकाना विश्वासात घेत या प्रकरणी शिक्षक मेटकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कल्याण न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्याला 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या नराधम शिक्षकाने अजून किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलीसुद्धा आत्ता सुरक्षीत नाहीत. शिक्षकच भक्षक बनल्याने अशा भक्षक शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI