एक कोटींची लाच घेताना पुण्यात तहसीलदाराला अटक

एक कोटींची लाच घेताना पुण्यात तहसीलदाराला अटक

पुणे : तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. पुण्याजवळील मुळशी तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना एसीबीने तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबीने सापळा रचून या तहसीलदाराला अटक केली. तहसीलदार सचिन डोंगरे यांनी तक्रारदाराकडे 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे यासंबंधी तक्रार दिली. […]

Nupur Chilkulwar

|

Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे : तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेणाऱ्या तहसीलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. पुण्याजवळील मुळशी तालुक्याचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना एसीबीने तब्बल एक कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एसीबीने सापळा रचून या तहसीलदाराला अटक केली.

तहसीलदार सचिन डोंगरे यांनी तक्रारदाराकडे 1 कोटी रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे यासंबंधी तक्रार दिली. त्यावरुन एसीबीने सापळा रचला. एसीबीच्या पथकाने तक्रारदाराला एका बॅगमध्ये सुमारे 95 लाख रुपयांच्या नोटा घेऊन डोंगरे यांना देण्यासाठी पाठवले. तक्रारदाराकडून ही लाचेची रक्कम स्वीकारताना सचिन डोंगरे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पुण्याच्या लवासा रोड येथे सचिन डोंगरे यांना अटक करण्यात आली. सचिन डोंगरे यांना देण्यात आलेल्या लाचेच्या रकमेत 15 लाख रुपयांच्या खऱ्या नोटा होत्या, तर उर्वरित खोट्या नोटा होत्या.

एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एसीबीची या वर्षातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.

काहीच दिवसांपूर्वी पुण्यात एका वकिलाला 1 कोटी 70 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें