नागपूरमध्ये 48 तासात 10 जणांचा मृत्यू, उष्माघाताची शक्यता

नागपूर : विदर्भात उन्हाचा कहर सुरु आहे. नागपुरात काल 47.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 15 वर्षातील हे दुसरे सर्वोच्च तापमान आहे. वाढत्या तापमानामुळे नागपूरात गेल्या 48 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळले आहे. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. […]

नागपूरमध्ये 48 तासात 10 जणांचा मृत्यू, उष्माघाताची शक्यता
Follow us
| Updated on: May 29, 2019 | 9:13 AM

नागपूर : विदर्भात उन्हाचा कहर सुरु आहे. नागपुरात काल 47.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 15 वर्षातील हे दुसरे सर्वोच्च तापमान आहे. वाढत्या तापमानामुळे नागपूरात गेल्या 48 तासात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळले आहे. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. काल 28 मे रोजी नागपूरात रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद करण्यात आली. नागपूरात काल 47.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. विशेष म्हणजे चंद्रपूरचं तापमान 47.8 डिग्री सेल्सियस एवढे नोंदलं गेलंय. हे जगातील शहरात आजचं सर्वाधिक तापमान आहे.

वाढत्या तापमानामुळे नागपूरमध्ये 10 जणांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. आज 29 मे रोजी नागपूरसह इतर परिसरात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या दहा जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर या 10 जणांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती उघड होईल.

चंद्रपूरचंही यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज 28 एप्रिलला तापमान 47.8 डिग्री सेल्सिअस एवढे नोंदले गेले असून यामुळे नागरिक मात्र हैराण झाले आहेत.  गेल्या काही दशकातील हे सर्वाधिक तापमान आहे. त्यापाठोपाठ नागपुरात काल 47.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 15 वर्षातील हे दुसरे सर्वोच्च तापमान आहे.

दरम्यान पुढील काही दिवस विदर्भात उष्णेतेची लाट काय राहणार आहे. उष्णतेची ही लाट मान्सून रखडल्यास अधिक काळापर्यंत राहणार असल्याने सध्यातरी सर्वसामान्यांना तापमानाच्या असहय्य चटक्यांपासून सुटका नसल्याचं स्पष्ट होत आहे.

केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात अशाच प्रकारच्या उष्णतेच्या लाटांमुळे कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे. मान्सूनच्या आगमनापर्यंत नागरिकांची उष्णतेने दैना होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. तापमानाच्या बाबतीत भारताने आखाती देशांनाही मागे सोडलंय.

संबंधित बातम्या

चंद्रपुरात आज जगातल्या सर्वोच्च तापमानाची नोंद

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.