दहशतवादी मसूद अजहरची किडनी खराब, पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : भारतातील मोस्ट वॉन्टेड यादीत टॉपवर असलेला दहशतवादी मौलाना मसूद अजहर हा रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात दाखल झाला आहे. किडनीच्या आजारामुळे रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात तो उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मसूदची किडनी खराब झाली आहे आणि सैन्याच्या रुग्णालयात त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यासह भारतातील […]

दहशतवादी मसूद अजहरची किडनी खराब, पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतातील मोस्ट वॉन्टेड यादीत टॉपवर असलेला दहशतवादी मौलाना मसूद अजहर हा रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात दाखल झाला आहे. किडनीच्या आजारामुळे रावळपिंडी येथील पाकिस्तानी सैन्याच्या रुग्णालयात तो उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मसूदची किडनी खराब झाली आहे आणि सैन्याच्या रुग्णालयात त्याच्यावर डायलिसिसचे उपचार सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी घटनांमध्ये मसूदचा हात होता.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील सर्वात खतरनाक असा हा म्होरक्या आहे. मात्र याच मसूद अजहरची तब्येत खराब झाल्याचे वृत्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनीही दिले होते. दहशतवादी संघटनेचा मास्टरमाइंड मसूद खूप आजारी आहे आणि त्याची तब्येत खराब असल्याने तो घरातून बाहेरही निघू शकत नाही, असं मोहम्द कुरेशी म्हणाले होते.

पुलवामा हल्ल्या मागे मसूदचा हात

पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. 14 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या या भ्याड हल्ल्याचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्याच्या मागे मसूद अजहचा हात आहे. जैश-ए-मोहम्मद यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. या हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारीला सकाळी भारतीय वायूसनेने दहशतवाद्यांच्या तळावर निशाणा करत एअर स्ट्राईक केली.

दहशतवाद्यांना पाकिस्तानची जाहीर मदत?

भारताने अनेकदा पाकिस्तानकडे दहशतवादी मसूद अजहर याची मागणी केली आहे. मसूद अजहर संबधित अनेक पुरावे भारताने पाकिस्तानला दिले आहेत.  मात्र प्रत्येकवेळी कारवाई करु असे सांगून मसूद अजहरला वाचवले जाते. पुलवामा हल्ल्याच्या मागे मसूद अजहरचा हात आहे यांचा पुरावा भारताकडे आहे. भारताने 27 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या संबधित एक डोजियरही  पाकिस्तानला दिले. मात्र यावेळीही पाकिस्तानकडून ठोस पुरावे देण्याची मागणी करण्यात आली.

 UN मध्ये मसूदला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव

दहशतवादाविरोधात भारताने सुरु केलेल्या या लढाईत भारताला जगातील अनेक देशांनी पाठिंबा दिला. यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानमधील दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही यूएनमध्ये मसूदला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव दिला.

कंधार कांड दरम्यान दहशतवादी मसूद वाचला

1999 मध्ये एअर इंडियाचं विमान आयसी-814 च्या हायजॅकिंग दरम्यान दहशतवादी मसूद भारताच्या हातातून वाचला होता. हायजॅकिंग दरम्यान दहशतवाद्यांनी विमानातील लोकांना सोडण्यासाठी मसूदसह तीन दहशतवाद्यांना सोडा अशी अट ठेवली होती. तेव्हा भारताने आपल्या नागरिकांच्या सुरक्षच्या कारणासाठी मसूदला सोडून दिले. तेव्हापासून हा खतरनाक दहशतवादी भारतासाठी डोके दुखी बनला आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.