थायलंडमध्ये माथेफिरु जवानाचा गोळीबार, 20 जणांचा मृत्यू

थायलंडमध्ये एका माथेफिरु जवानाने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 20 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, अनेक जण जखमीही झाले. तब्बल 17 तासांच्या थरारानंतर त्या जवानाला ठार करण्यात थायलंड पोलिसांना यश आलं.

थायलंडमध्ये माथेफिरु जवानाचा गोळीबार, 20 जणांचा मृत्यू

बँकॉक : थायलंडमध्ये एका माथेफिरु जवानाने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात 20 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला (Thailand Soldier Firing). तसेच, अनेक जण जखमीही झाले. तब्बल 17 तासांच्या थरारानंतर त्या जवानाला ठार करण्यात थायलंड पोलिसांना यश आलं. ही घटना थायलंडच्या पूर्वेकडील कोरात शहरात घडली (Thailand Soldier Firing).

सुरक्षा विभागाच्या प्रवक्तत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाकरापंथ थोमा नावाच्या ज्युनिअर अधिकाऱ्याने मिलिट्री कॅम्पधून शस्त्र चोरी केले आणि कमांडिंग अधिकाऱ्याची हत्या केली. त्यानंतर हा जवान शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये घुसला आणि त्याने बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. त्याने काहींना ओलिस ठेवले.

शॉपिंग सेंटरच्या टर्मिनल 21 येथे पोहोचणयापूर्वी त्याने रस्त्यातही अनेक ठिकाणी गोळीबार केला. स्थानिक मीडियाने जारी केलेल्या दृष्यांमध्ये हा जवान गाडीतून उतरुन लोकांवर गोळीबार करताना दिसत आहे. तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो रायफल घेऊन दिसत आहे.

शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार केल्यानंतर त्याने काही लोकांना ओलिस ठेवले. तब्बल 17 तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी या माथेफिरु जवानाला ठार केले आणि सर्व लोकांना सुखरुप मॉलच्या बाहेर काढले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI