‘भाई’ सुटल्याचा आनंद! तुरुंगातून सुटलेल्या गुंडाच्या स्वागतासाठी नाशकात समर्थकांची गर्दी

ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे याची नाशिक कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी समर्थकांची तुफान गर्दी उसळली.

'भाई' सुटल्याचा आनंद! तुरुंगातून सुटलेल्या गुंडाच्या स्वागतासाठी नाशकात समर्थकांची गर्दी

नाशिक : नागपुरात गँगस्टरच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने गर्दी जमल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्येही असाच काहीसा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तुरुंगातून सुटलेला गुंड सिद्धेश अभंगेच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये समर्थकांची गर्दी उसळली होती. (Thane Goon Siddhesh Abhange freed from Nashik Jail supporters gather to welcome)

नाशिकच्या तुरुंगात शिक्षा भोगून झालेला ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धेश अभंगे याची कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर अभंगेच्या स्वागतासाठी समर्थकांची तुफान गर्दी उसळली.

कार्यकर्ते आणि समर्थकांचा घोळका रस्त्यावर जमल्याने नाशिक जेल रोड परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून कारागृह परिसरातच स्वागत समारंभ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोण आहे सिद्धेश अभंगे?

सिद्धेश अभंगे हा ठाण्यातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी गेल्या वर्षी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यामुळे नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती.

बाल्या बिनेकरच्या अंतयात्रेला गर्दी

नागपुरात भरदिवसा हत्या करण्यात आलेल्या गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी उसळली होती. लालगंज खैरीपुरा भागातून निघालेल्या अंत्ययात्रेत दोन हजार जण सहभागी झाल्याचे बोलले जाते. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागपूरमधील गजबजलेल्या भोले पेट्रोल पंप चौकात शनिवारी पाच आरोपींनी गँगस्टर बाल्या बिनेकरची सिनेस्टाईल हत्या केली होती.

बाल्या राहत असलेल्या लालगंज खैरीपुरा भागातून अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत दोन हजाराहून जास्त नागरिक सहभागी झाल्याची माहिती आहे. परिसरातील घरांच्या छतावर बघ्यांची संख्या मोठी होती. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Thane Goon Siddhesh Abhange freed from Nashik Jail supporters gather to welcome)

संबंधित बातम्या

नागपुरात गँगस्टर बाल्या बिनेकरच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, छतांवरही बघे, दोन हजार जण जमल्याची चर्चा

कुख्यात गुंड बाल्या बिनेकरचे मारेकरी 24 तासात सापडले, हत्येचं कारणही उघड

(Thane Goon Siddhesh Abhange freed from Nashik Jail supporters gather to welcome)

Published On - 3:46 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI