सिटी स्कॅनसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, टेक्निशियन अटकेत

सिटी स्कॅनसाठी आलेल्या एका महिलेवर टेक्निशियने हॉस्पिटलमध्येच लैंगिक अत्याचार (molesting during CT scan) केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.

सिटी स्कॅनसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार, टेक्निशियन अटकेत

ठाणे : सिटी स्कॅनसाठी आलेल्या एका महिलेवर टेक्निशियने हॉस्पिटलमध्येच लैंगिक अत्याचार (molesting during CT scan) केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.  (molesting during CT scan)

जिन्स थॉमस असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. तक्रारदार 35 वर्षीय महिला उल्हासनगरातील एका हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यासाठी आली होती. त्यावेळी सिटीस्कॅन करणारा जिन्स थॉमस याने पीडित महिलेशी  लगट करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

या घटनेने भयभीत झालेल्या पीडित महिलेने हिललाईन पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी थॉमसविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published On - 10:45 am, Wed, 25 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI