The Kapil Sharma Show | भारतीवर कमेंट केल्याने चाहत्याला झापले, कपिल शर्मा ट्विटरवर ट्रोल

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) सोनी टीव्हीच्या द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) माध्यमातून प्रेक्षकांना हसवत असतो.

The Kapil Sharma Show | भारतीवर कमेंट केल्याने चाहत्याला झापले, कपिल शर्मा ट्विटरवर ट्रोल
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 1:48 PM

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) सोनी टीव्हीच्या द कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) माध्यमातून प्रेक्षकांना हसवत असतो. पण शोमध्ये अश्लिल टिप्पण्याकरण्याचा आरोप त्याच्यावर नेहमी होतो. यावेळी कपिल शर्मा एका नव्या वादात सापडला आहे. कपिल शर्माने भारतीच्या अटकेनंतर सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या ट्रोलरच्या टिप्पणीला प्रत्युत्तर दिले. मात्र, त्याच्या या प्रत्युत्तरानंतर ट्विटरवर जोरदार हंगामा झाला होता. हे पाहून कपिलने आपले ट्विट डिलीट केले. मात्र, तोपर्यत अनेकांनी कपिलने केलेल्या ट्विटचे स्क्रीन शॉट काढले होते. (The Kapil Sharma Show, Kapil Sharma trolled on Twitter) kapil sharma ट्विटरवर भानु प्रताप सिंह नावाच्या व्यक्तीने कपिलला टॅग केले आणि लिहिले की, ‘भारतीचे काय झाले? जोपर्यंत तिला पकडले गेले नव्हते तोपर्यत ती म्हणत होती ना ड्रग्स घेत नाही? बहुतेक तीच अवस्था तुमची आहे.’ यावर कपिल शर्मा भडकला आणि म्हणाला ‘पहिल्यांदा तुझा साइजचे शर्ट शिऊन घे जाड्या.’ कपिल शर्माने हे ट्विट रात्री 2 वाजता केले होते. मात्र, त्यानंतर ट्विटवर जेव्हा कपिलने लोकांच्या कमेंट वाचल्या तेव्हा कपिलला त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी हे ट्विट डिलीट केले. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील एका मोठ्या कारवाईत एनसीबीने प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Bharti Singh) आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) यांना अटक केली होती. एनसीबीने शनिवारी (21 नोव्हेंबर) खार दांडा येथे कारवाई केली होती. या ठिकाणाहतून एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे 15 बॉटल एल. एस. डी. हे ड्रग आणि 40 ग्राम गांजासह नेट्राझेपम हे ड्रग्स स्वरूपातील औषध ही सापडले होते. या ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या व्यक्तीच्या चौकशीत कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांचे नाव उघडकीस आले होते. यानंतर एनसीबी अधिकाऱ्यांनी भारती हिच्या घरी धाड टाकली असता, तिच्या घरी 86.5 ग्राम गांजा सापडला. भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष या दोघांनीही ते गांजा घेत असल्याची कबुली दिली होती. यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. त्याच प्रमाणे इतर कारवाईत गुन्हा क्रमांक 33/20 मध्ये एनसीबीने मोठ्या प्रमाणात एमडी हे ड्रग्स जप्त केले. एनसीबीने दोन फरार गुन्हेगारांना अटकही केली होती. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachiyaa) आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना थेट कोर्टात हजर करण्यात आले होते. शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. तर, तब्बल 17 तास चौकशी केल्यानंतर हर्ष लिंबाचीयालाही अटक करण्यात आली. हर्ष आणि भारती यांना NCB ने आधीच समन्स बजावले होते. नंतर NCB ने भारतीच्या घरी धाड टाकून झाडाझडती केली, त्यावेळी तिच्या घरी संशयित वस्तू सापडल्यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी दोघांना शनिवारी सकाळीच ताब्यात घेतले होते. मग संध्याकाळी चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या : 

Drugs Connection | भारती-हर्षच्या अटकेनंतर मालिका विश्वात खळबळ, पाहा कलाकार काय म्हणतायत…

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी एनसीबी अधिकारी भारती सिंहच्या कर्मचार्‍यांचीही चौकशी करू शकतात!

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर, कागदपत्रांची पूर्ती करून भारती-हर्ष घरी जाण्यासाठी रवाना

(The Kapil Sharma Show, Kapil Sharma trolled on Twitter)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.