ना वडापाव, ना बर्गर, भूक भागवण्यासाठी ट्युबलाईट खाणारा अवलिया

ना वडापाव, ना बर्गर, भूक भागवण्यासाठी ट्युबलाईट खाणारा अवलिया

ट्युबलाईट खराब झाली किंवा बंद झाली तर आपण ती फेकून देतो. पण रत्नागिरीत एक अवलिया बंद झालेल्या ट्युबलाईट (Tube light eating) चक्क खावून आपली पोटाची भूक भागवत आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Dec 21, 2019 | 10:24 PM

रत्नागिरी : ट्युबलाईट खराब झाली किंवा बंद झाली तर आपण ती फेकून देतो. पण रत्नागिरीत एक अवलिया बंद झालेल्या ट्युबलाईट (Tube light eating) चक्क खावून आपली पोटाची भूक भागवत आहे. कुमार यादव असं या अवलियाचे नाव आहे. ट्युबलाईट खातो त्यामुळे सध्या संपूर्ण जिल्ह्यात कुमारच्या नावाची (Tube light eating) चर्चा सुरु आहे.

कुमार यादव हा मुळचा छत्तीसगढमधील आहे. सध्या तो नोकरीच्या शोधात गोवा फिरत रत्नागिरीत आला आहे. नोकरीसाठी आणि अन्नासाठी भटकंती करणाऱ्या कुमारला नोकरी काही मिळाली नाही. नोकरी नसल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी हा अवलिया चक्क ट्युबलाईट खावून आपले पोट भरत आहे.

घरातील फेकून दिलेल्या ट्युबलाईटचा वापर तो आपल्या खाण्यासाठी करत आहे. गेल्या नऊ वर्षापासून कुमार या ट्युबलाईट खात आहे. अद्याप त्याला कोणतीही इजा झालेली नाही.

कुमारचे ट्युबलाईट खाण्याचे व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमुळे सध्या कुमारच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें