“रसोडे में कौन था?” सोशल मीडियावर व्हायरल मीम्सवर खुद्द कोकिलाबेन म्हणतात….

'साथ निभाना साथिया' मालिकेतील कोकिलाबेन रुपल पटेल यांनी जेव्हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

रसोडे में कौन था? सोशल मीडियावर व्हायरल मीम्सवर खुद्द कोकिलाबेन म्हणतात....
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 3:45 PM

मुंबई : युवा संगीतकार यशराज मुखाते याने ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील एका संवादाला म्युझिक देऊन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ‘रसोडे में कौन था’ या डायलॉगला भन्नाट बीट्स जोडून यशराज मुखातेने व्हिडीओ शेअर केल्यावर तो व्हायरल तर झालाच, पण मीम्सचाही पाऊस पडू लागला आहे. हा संवाद ओठी असलेल्या ‘साथ निभाना..’ मालिकेतील कोकिलाबेन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (The original Kokilaben reacts to ‘Rasode mein kaun tha?)

‘साथ निभाना साथिया’ मालिकेतील कोकिलाबेन मोदी यांची भूमिका साकारणाऱ्या प्रख्यात अभिनेत्री रुपल पटेल हा व्हिडीओ पाहून भलत्याच खुश झाल्या आहेत. खरं तर ‘साथ निभाना..’ ही मालिका संपून तीन वर्ष उलटली. सात वर्ष चाललेली ही मालिका प्रचंड गाजली होती. मात्र ‘रसोडे में कौन था’ या डायलॉगला बीट्स जोडून यशराज मुखातेने ही मालिका पुन्हा चर्चेत आली.

रुपल पटेल सध्या ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेत काम करतात. रुपल यांनी जेव्हा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्या सोशल मीडियावर नसल्यामुळे कुटुंबिय आणि मित्रांनी कॉल करेपर्यंत त्यांनी हा व्हिडीओ पाहिला नव्हता.

“मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. माझे संवाद रॅपमध्ये रुपांतरित होऊ शकतात याची मी कधी कल्पनाही करु शकत नव्हते. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून मला कौतुकाचे अनेक मेसेज मिळत आहेत. कुटुंब, मित्र आणि चाहतेसुद्धा माझे अभिनंदन करण्यासाठी कॉल करत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही हा व्हिडिओ शेअर केल्याची मला माहिती मिळाली. मी कृतकृत्य झाले” अशा भावना रुपल पटेल यांनी व्यक्त केल्या.

काय आहे हा सीन?

व्हिडीओमध्ये रुपल पटेल यांचे पात्र कोकिलाबेन आपली सून गोपी बहू (अभिनेत्री जिया मनेक) आणि राशी बहू (अभिनेत्री ऋचा हसबनीस) यांना चणे काढून रिकामा कुकर गॅसवर कोणी ठेवला? याबद्दल फटकारताना दिसतात. ‘रसोडे में (स्वयंपाकघरात) कौन था? मै थी? या तुम थी?’ हा प्रश्न सध्या मीम्सचा विषय ठरला आहे. (The original Kokilaben reacts to ‘Rasode mein kaun tha?)

मुळात कोकिलाबेन यांना चणे कोणी काढून ठेवले, याची कल्पना असतेच, मात्र गोपीकडून ते वदवून घेत राशीचे पितळ उघडे पाडण्यासाठी त्या तिला जाब विचारतात, असा हा मूळ सीन होता.

(The original Kokilaben reacts to ‘Rasode mein kaun tha?)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.