VIDEO : हाथ जोडले, कान पकडले, देवीची माफी मागत मुकूट घेऊन चोर लंपास

आंध्र प्रदेशातील एका दुर्गा मंदिरात चोरीचा (theft god crown in Hyderabad temple) नवा प्रकार पाहायला मिळाला आहे.

VIDEO : हाथ जोडले, कान पकडले, देवीची माफी मागत मुकूट घेऊन चोर लंपास

हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील एका दुर्गा मंदिरात चोरीचा (theft god crown in Hyderabad temple) नवा प्रकार पाहायला मिळाला आहे. एका चोराने देवी समोर हाथ जोडून, डोक टेकवून, कान पकडून माफी मागून थेट देवीचा मुकूट चोरला आहे. ही घटना हैद्राबादमधील गनफॉउंडरी येथील मंदिरात (theft god crown in Hyderabad temple) घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जातो. तो देवीसमोर हाथ जोडतो. पूर्ण श्रद्धेने देवीच्या पाया पडतो. डोक टेकवतो. तसेच कान पकडून माफी मागतो. त्यानंतर संधी पाहून थेट देवीचे मुकूट चोरतो. हे मुकूट लपवून तेथून पळ काढतो.

देवीच्या मंदिरात चोराने थेट देवीचा मुकूट चोरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत आपण मंदिरात अनेक चोऱ्या घडल्याचे पाहिले. पण हैद्राबादमधील या घटनेने प्रत्येकाला आश्चर्यचकीत केले आहे. चोर दिवसा ढवळ्या देवीच्या मंदिरात येऊन मुकूट घेऊन फरार झाला आहे. चोरी करण्याची ही पद्धत पाहून पोलीसही चकीत झाले आहेत.

हैद्राबाद पोलीस सध्या या चोराचा शोध घेत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे चोराचा शोध घेतला जात आहे. देवीचा मुकूट चोरी झाल्याने तेथील भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.


Published On - 7:01 pm, Fri, 22 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI