दिल्लीत एका महिन्यातील तिसरं अग्नितांडव, गोदामाला लागलेल्या आगीत 9 लोकांचा मृत्यू

दिल्लीमधील किराडी परिसरात इंदर एनक्लेवमध्ये रात्री जवळपास 12.30 वाजता एका गोदामाला आग लागली (Delhi Fire accident). एका घराच्या ग्राऊंड फ्लोअरवर कपड्यांचं गोदाम होतं.

दिल्लीत एका महिन्यातील तिसरं अग्नितांडव, गोदामाला लागलेल्या आगीत 9 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीमधील किराडी परिसरात इंदर एनक्लेवमध्ये रात्री जवळपास 12.30 वाजता एका गोदामाला आग लागली (Delhi Fire accident). एका घराच्या ग्राऊंड फ्लोअरवर कपड्यांचं गोदाम होतं. तेथूनच आग पसरली आणि आगीने पूर्ण घराला घेरलं. या भीषण आगीत 9 लोकांचा मृत्यू झाला. या घरात एकूण 11 लोक राहत असल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. जखमींना दिल्लीतील संजय गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. एकाच महिन्यातील दिल्लीतील ही तिसरी आगीची घटना आहे (Delhi Fire accident).

या आगीत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे,

रामचंद्र झा सुदरिया देवी संदू झा उदय चौधरी मुस्कान अंजली आदर्श तुलसी एका महिलेच्या मृतदेहाची ओळख पटणे अजून बाकी आहे.

आग इतकी भीषण होती की विझवण्यासाठी घटनास्थळावर 7 अग्निशामक गाड्यांना जवळपास 3 तास मेहनत घ्यावी लागली. ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर कपड्यांचं गोदाम होतं. या इमारतीचे वरचे दोन मजले निवासासाठी वापरले जात होते. इमारतीत अग्नि सुरक्षा यंत्रणा नव्हती. त्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण गेले. दुसऱ्या मजल्यावर एका गॅस सिलिंडरचाही स्फोट झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भिंतीचा काही भागही कोसळला.

दिल्लीत 8 डिसेंबरला अनाज मंडी परिसरात भीषण आग लागली होती. त्यात 43 लोकांचा मृत्यू झाला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI