गरिबीला कंटाळून तीन मुलांची हत्या करुन आईचीही आत्महत्या

जन्मदात्या आईनेच आपल्या तीन मुलांची हत्या करत स्वत: आत्महत्या केली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गरिबीला कंटाळून तीन मुलांची हत्या करुन आईचीही आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 9:40 AM

पुणे : जन्मदात्या आईनेच आपल्या तीन मुलांची हत्या करत स्वत: आत्महत्या केली आहे. ही घटना पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे घडली. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फातिमा बागवान असं या आईचे नाव आहे. गरिबीला कंटाळून नैराश्यामध्ये येऊन हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे. पिंपर-चिंचवड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मृत फातिमा बागवान हिचे रविवारी (28 जुलै) पतीसोबत जोरदार भांडण झाले होते. हा वाद इतका टोकाला गेला की, फातिमाचा पती घरा बाहेर पडला आणि तिने तीन मुलांसह आत्महत्या केली.

थोड्यावेळाने फातिमाचा पती घरी परतला. पण बराच वेळ दार वाजवूनही कुणीच प्रतिसाद देत नसल्याने फातिमाच्या पतीने पोलिसांना बोलावून दार उघडलं आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झाल्याच त्याला बघायला मिळाल. संपूर्ण परिवार फासावर लटकेललं पाहून पोलिसांनाही धक्का बसला.

पोलीस आणि फातिमाच्या नातवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ नैराश्यातून तिने ही आत्महत्या केली असल्याचे म्हटलं जात आहे.

सर्व मृतदेहांचे शव विच्छेदन झाल्यानंतर या घटनेतील अनेक सत्य  पुढे येतील. मात्र तोपर्यंत तरी फातिमा आणि तिचे तीनही निरागस मुलं केवळ गरिबीने आलेल्या नैराश्याने घेतलेले बळीच आहेत अस म्हटलं तर  वावग ठरणार नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.