मुलगा, मुलगी भेद करणाऱ्यांना सणसणीत चपराक! मुलगा नसलेल्या वडिलांना मुलींचेच खांदा देत अंत्यसंस्कार

आलटून पालटून  तिन्ही मुलींकडे हे दाम्पत्य वास्तव्य करून आपलं आयुष्य जगत होते. वार्धक्याने गणपत भोईर यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले.

मुलगा, मुलगी भेद करणाऱ्यांना सणसणीत चपराक! मुलगा नसलेल्या वडिलांना मुलींचेच खांदा देत अंत्यसंस्कार
भिवंडीत मुलींनी केले पित्यावर अंत्यसंस्कार
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 10:58 PM

भिवंडी : भिवंडीत (Bhiwandi) मुलगा नसणाऱ्या वृद्धाचे मुलींनी खांदा देत अंत्यसंस्कार केले आहेत. या घटनेनं मुलगा, मुलगी असा भेद करणाऱ्यांना या घटनेनं सणसणीत चपराक बसली आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगी म्हणजे परक्याचे धन या म्हणीप्रमाणे समाज आजही वावरताना दिसतो. अशातच भिवंडीत मुलगा नसलेल्या गणपत कृष्णा भोईर (Ganpat Krishna Bhoir) या 87 वर्षीय वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिन्ही मुली पुढे सरसावल्यात. सरसावत त्यांनी मृतदेहाच्या तिरडीला खांदा देत अंत्यसंस्कार केले आहेत. भिवंडी शहरातील नारपोली (Narpoli, Bhiwandi) या भागात राहणारे गणपत कृष्णा भोईर आणि विठाबाई गणपत भोईर या दाम्पत्यास एक मुलगा तर तीन मुली असा परिवार होता. परंतु डोक्यात ताप शिरल्याने मुलगा गणेश वेडसर होऊन वयाच्या 25 व्या वर्षी त्याचे निधन झालं होतं. तेव्हा पासून काबाडकष्ट करणाऱ्या गणपत भोईर यांनी सुषमा, सुलोचना आणि शिल्पा या तिन्ही मुलींना लहानाचं मोठं केलं. त्यांचा विवाह लावून दिला होता.

मुलगा तारुण्यातच गमावला, पण…

दरम्यान, वय वाढत गेले तसे कष्ट झेपत नसल्याने वार्धक्यात घरीच असलेल्या आईवडिलांचा सांभाळ तिन्ही मुली करीत होत्या. आलटून पालटून  तिन्ही मुलींकडे हे दाम्पत्य वास्तव्य करून आपलं आयुष्य जगत होते. वार्धक्याने गणपत भोईर यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. गणपत काका म्हणून ओळखले जाणारे गणपत भोईर यांनी आपल्या हयातीत अनेकांचे संसार उभे करण्यसाठी काम केलं. परंतु त्यांच्या वृद्धपकाळात गरिबीमुळे सख्या नात्यातील अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.

पाहा अंत्यसंस्काराचा व्हिडीओ –

अखेर मुलींनीचं आपल्या जन्मदात्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मुलींनी तिरडीला खांदा देत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेत. सुलोचना, शिल्पा यांनी तिरडीला खांदा दिला तर मोठी मुलगी सुषमाने तिरडी समोर शिदोरी धरत स्मशानभूमीत मृतदेहास अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. मुलींनी घेतलेल्या या निर्णयाचे त्यावेळी उपस्थित सर्वजण भारावले होते.

आणि उपस्थितांचे डोळे पाणावले!

मुलींच्या या धाडसी निर्णयाचं उपस्थितांनी स्वागत करत मुलगा मुलगी हा भेद मानणाऱ्या आणि स्वार्थासाठी नाती जोपासणाऱ्या समाजाला चपराक लगावली, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. या मुलींनी ही कृती करूनच इथवरच न थांबता आता वडिलांच्या मृत्यूनंतर आपल्या वृद्ध आईचा सांभाळ करण्याची शपथ अंत्यसंस्कार प्रसंगी घेतली. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले.

संबंधित बातम्या :

दिल्लीतून पळाली, पालघरात मिळाली! सजग रिक्षाचालकामुळं लेक सापडली

ज्यानं अ‍ॅसिड हल्ला केला, त्या पतीला सोडवण्यासाठी चक्क पत्नीची याचना! म्हणते ‘सोडा त्याला, नवराच तर आहे’

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.