नाशिक येथील कादवा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

दिंडोरी येथे कादवा नदीत आज (9 जून) सकाळी अकराच्या दरम्यान तीन जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ओझे गावातील कादवा नदी येथे घडली.

नाशिक येथील कादवा नदीत बुडून तिघांचा मृत्यू

नाशिक : दिंडोरी येथे कादवा नदीत आज (9 जून) सकाळी अकराच्या दरम्यान तीन जणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना ओझे गावातील कादवा नदी येथे घडली. अनिता वाघमारे (29), मुलगा ओकांर वाघमारे (14) आणि प्राजक्ता बाळू गांगोडे (15) अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. कादवा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना ही दुर्देवी घटना घडली.

कादवा नदी पात्रात नुकतेच करंजवण धरणातून पाणी सोडल्यामुळे ओझे गावाजवळ पाण्याची पातळी वाढली. यावेळी कपडे धूत असताना तोल जाऊन पडल्याने तिघेही कादवा नदी पात्रात बुडाले. मात्र निर्जन भाग असल्यामुळे ही बाब कोणाच्याही लवकर लक्षात आली नाही. परंतु नदीपात्राच्या जवळून जात असलेल्या एका भंगारवाल्याच्या लक्षात आल्याने त्याने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत कादवा नदी पात्रात शोध कार्य सुरु केले.

शोध कार्य सुरु असताना पहिले अनिता वाघमारे यांचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर दुपारी प्राजक्ता गांगोडेचा मृतदेह सापडला. तर सायंकाळी ओंकार वाघमारेचा मृतदेह हाती लागला. तिघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने ओझे आणि उमराळे गावावर शोककळा पसरली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI