टिक-टॉकचे व्यसन, व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेची आत्महत्या

अरियालूरमध्ये 24 वर्षाच्या महिलेने टिक-टॉक अॅपच्या व्यसनातून थेट आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. महिलेचा संपूर्ण दिवस टिक-टॉकवर व्हिडीओ बनवण्यात जात होता.

टिक-टॉकचे व्यसन, व्हिडीओ रेकॉर्ड करत महिलेची आत्महत्या

चेन्नई (तामिळनाडू) : अरियालूरमध्ये 24 वर्षाच्या महिलेने टिक-टॉक अॅपच्या व्यसनातून थेट आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. महिलेचा संपूर्ण दिवस टिक-टॉकवर व्हिडीओ बनवण्यात जात होता. पतीने याला विरोध केल्यामुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलत विष घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे तिने आत्महत्या करतानाचा टिक-टॉक व्हिडीओही बनवला. अनिता असं या महिलेचं नाव आहे.

अनिताच्या कुटुंबात तिचा 29 वर्षाचा पती, चार वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. अनिताने आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या पतीला मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यायला सांगितली.

अनिताला टिक-टॉक अॅपबद्दल तिच्या मैत्रिणीने सांगितले होते. यानंतर तिचा संपूर्ण वेळ ती टिक-टॉकवर घालवत होती. यावेळी तिच्या कुटुंबातील अनेकांनी तिला विरोध केला होता. पण तिने कुणाचे ऐकले नाही. अनिता टिक-टॉकवर सतत व्यस्त असल्याचेही तिच्या कुटुंबातील अनेकांनी तिच्या पतीला सांगितले होते.

अनिताला सांगितल्यावरही तिच्यामध्ये बदल झाला नसल्याने या गोष्टीची माहिती तिच्या पतीला दिली. अनेकजणांनी तिला समजवले आणि टिक-टॉकचा वापर न करण्याचा सल्ला दिला, पण तरीही अनिताने कुणाचेही ऐकले नाही.

एकदा अनिताची मुलगी खेळता खेळता जखमी झाली होती आणि अनिता टिक-टॉक अॅपमध्ये व्यस्त होती. मात्र आपली मुलगी जखमी झाल्याचे अनिताला माहितच नव्हते. यामुळे पुन्हा एकदा घरातल्यांनी या घटनेची माहिती अनिताच्या पतीला दिली. यानंतर अनिता आणि तिच्या पतीमध्ये यावरुन जोरदार भांडण झाले. यामुळे दुखी झालेल्या अनिताने टिक-टॉकवर विष पिऊन आत्महत्या करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI