World’s Safest City List | टोकियो जगातील सर्वात सुरक्षित शहर, मुंबई-दिल्लीचा क्रमांक कितवा?

जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये टोकियो पहिल्या क्रमांकावर असून मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या स्थानी आहे

World's Safest City List | टोकियो जगातील सर्वात सुरक्षित शहर, मुंबई-दिल्लीचा क्रमांक कितवा?

सिंगापूर : जगातील सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये जपानची राजधानी टोकियोने (World’s Safest City List) अव्वल स्थान कायम राखलं आहे. साठ देशांमधील शहरांचा समावेश असलेल्या या यादीत भारताची राजधानी आणि आर्थिक राजधानी मात्र तळाला आहेत. या क्रमवारीत मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या नंबरवर (World’s Safest City List) आहेत.

जगभरातील शहरांमध्ये आकारमानाने आणि लोकसंख्येच्या दृष्टीने वाढ होत आहे. अशावेळी सुरक्षा आणि गोपनीयता यांच्यात संतुलन राखणं सरकार, खासगी क्षेत्र आणि नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. सिंगापूरमध्ये आयोजित ‘सुरक्षित शहर परिषदे’त (Safe Cities Summit) याविषयी तज्ज्ञांनी मंथन केलं. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) ने सर्वात सुरक्षित शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे.

जगातील सर्वात सुरक्षित अशा शहरांची यादी (World’s Safest City List) तयार करण्यात आली असून उगवत्या सूर्याचा देश अशी ओळख असलेल्या जपानच्या राजधानीने अग्रस्थान पटकावलं आहे. पाच खंडातील 60 देशांमधल्या विविध शहरांचा विचार यासाठी करण्यात आला.

‘भारतासोबत युद्ध झालं, तर पाक हरेल’, खुद्द इम्रान खान यांची कबुली

पहिल्या क्रमांकावर टोकियो, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर, तर तिसऱ्या क्रमांकावर ओसाका आहे. मुंबई 45 व्या, तर दिल्ली 52 व्या नंबरवर आहेत. टॉप तीनमध्येच जपानमधील दोन शहरांसह तिन्ही आशियाई शहरांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून टोकियो या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

टॉप 10 सुरक्षित शहरं

1. टोकियो (जपान) 2. सिंगापूर (सिंगापूर) 3. ओसाका (जपान) 4. टोरंटो (कॅनडा) 5. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) 6. अॅमस्टरडॅम (नेदरलँड) 7. सिडनी (ऑस्ट्रेलिया) 8. स्टॉकहोम (स्वीडन) 9. हाँग काँग 10. झुरिच (स्वित्झर्लंड)

आरोग्य सुरक्षा, पायाभूत सुविधांची सुरक्षितता, वैयक्तिक सुरक्षा आणि स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाची सायबर सुरक्षा हे निकष (World’s Safest City List) वापरण्यात आले होते.

यूएस मधील एकाही शहराला अव्वल दहामध्ये स्थान पटकावता आलेलं नाही. सॅन फ्रान्सिस्को 15 व्या नंबरवर आहे. गेल्या वेळी दहाव्या क्रमांकावर असलेलं न्यूयॉर्क 21 व्या क्रमांकावर फेकलं गेलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI