VIDEO : टोल कर्मचाऱ्याला बोनेटवर बसवून 6 किमी फरफटत नेलं!

VIDEO : टोल कर्मचाऱ्याला बोनेटवर बसवून 6 किमी फरफटत नेलं!

गुरुग्राम : टोल कर्मचाऱ्याला कारच्या बोनटवर बसवून तब्बल सहा किलोमीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. शनिवारी (13 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास हरियाणातील गुरुग्राममध्ये ही घटना घडली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून  संदीप आणि प्रितम असं या दोघांचे नाव आहे. हे दोघेही गुरुग्राम येथील रहिवासी आहेत.

खेडकी डोला टोलनाक्यावर टोल कर्माचारी अशोक कुमार याने एका इनोव्हा कारला अडवलं. त्यावेळी आरोपी प्रितम गाडी चालवत होता. अशोकने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात प्रितमने गाडीचा वेग वाढवला. यानंतर अशोक गाडीच्या बोनटवर चढला. आरोपीने गाडी न थांबवता अशोकला बोनटवर बसवत सहा किलोमीटर फरफटत नेले.


टोल कर्माचारी अशोक कुमारने ड्रायव्हरकडे पैसे मागितले, यावर आरोपी ड्राव्हर म्हणाला, “पोलीस माझी गाडी अडवत नाहीत, तर तू कोण आहेस?” यानंतर अशोक गाडी अडवण्यासाठी थेट गाडीच्या समोर येऊन उभा राहिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

“आरोपींनी मला आधी शांत जागेवर घेऊन गेले. तिथे त्यांनी मला मारहाण केली आणि माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी तिथून पळ काढला आणि जीव वाचवला. यानंतर थेट मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने या दोघांना अटक केली.” असे अशोकने सांगितले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI