झाडांना जीवदान देणारी अनोखी रुग्णवाहिका

नागपूर : रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारी आणि रुग्णांचा जीव वाचवणारी रुग्णवाहिका (Ambulance) सर्वांना माहीत आहे. पण आज आम्ही तुम्हाला एक अनोखी रुग्णवाहिका दाखवणार आहोत, या रुग्णवाहिकेचे नाव आहे प्लांट अँम्बुलंस म्हणजेच झाडांना जीवदान देणारी रुग्णवाहिका.  नागपुरातील पर्यावरणप्रेमींनी ही रुग्णवाहिका सुरु केली आहे. महाराष्ट्रात सध्या दुष्काळ पडला आहे. उन्हाळा सुरु असल्याने झाडांना पाणी मिळत नाही. यामुळे […]

झाडांना जीवदान देणारी अनोखी रुग्णवाहिका
Namrata Patil

|

Jul 05, 2019 | 3:46 PM

नागपूर : रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवणारी आणि रुग्णांचा जीव वाचवणारी रुग्णवाहिका (Ambulance) सर्वांना माहीत आहे. पण आज आम्ही तुम्हाला एक अनोखी रुग्णवाहिका दाखवणार आहोत, या रुग्णवाहिकेचे नाव आहे प्लांट अँम्बुलंस म्हणजेच झाडांना जीवदान देणारी रुग्णवाहिका.  नागपुरातील पर्यावरणप्रेमींनी ही रुग्णवाहिका सुरु केली आहे.

महाराष्ट्रात सध्या दुष्काळ पडला आहे. उन्हाळा सुरु असल्याने झाडांना पाणी मिळत नाही. यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला असणारी अनेक झाडे वाळतायत. तर अनेक झाडं मरण्याच्या स्थितीत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेत नागपूरातील पर्यावरणप्रेमी जतींदर पाल सिंग यांनी झाडांना जीवदान देणारी रुग्णवाहिका सुरु केली आहे. या रुग्णवाहिकेत पाण्याचे मोठे टँक, रिकाम्या बॉटल्स, पाईप आणि झाडांवर उपचारासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे.

सुरुवातीला जतींदर पाल सिंग यांच्यासोबत इतर पर्यावरणप्रेमी छोट्या बॉटल्सने ते पाणी घेऊन जायचे. मात्र त्यानंतर त्यांनी स्व: खर्चाने फेब्रुवारी महिन्यात ही रुग्णवाहिका सुरु करण्यात आली आहे. दोन महिन्यापूर्वी सुरु केलेल्या या रुग्णवाहिकेद्वारे आतापर्यंत 150 ते 200 झाडांना जीवदान मिळाले आहे.

नुकतंच प्लांट अँम्बुलंसला नागपूरातील काटोल रोडवर राजभवन परिसरात झाड वाचवण्यासंदर्भात फोन आला. अवघ्या काही सेकंदात ही रुग्णवाहिका काटोल रोडवर राजभवन परिसरात दाखल झाली. त्यानंतर पर्यावरण प्रेमी जतींदर पाल यांनी मरणावस्थेत असलेल्या झाडांवर औषधोपचार केले. त्या झाडांभोवती माती टाकली, बराच काळ पाणी न मिळाल्याने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या झाडांना पुरेसे पाणी देण्यात आलं. अशाचप्रकारे नागपूरातील सेमीनरी हिल्स या परिसरात उन्हामुळे वाळलेल्या झाडांवर पाण्याची फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे पाणी दिल्यानंतर या दोन्ही परिसरातील झाड अगदी टवटवीत दिसू लागली आहेत.

नागपूरातील पर्यावरण प्रेमींनी सुरु केलेल्या प्लांट अँम्बुलंसला सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे. झाड वाळतात हे दु:ख कुरवाळत न बसता, पर्यावरणप्रेमींनी झाडांना जीवदान देणारी युक्ती शोधून काढली आहे. झाडं वाचवण्यासाठी सुरु केलेल्या या मोहीमेचे सर्व पर्यावरणप्रेमी कौतुक करत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें