‘तुकाराम मुंढे हिटलर, लोकप्रतिनिधींना तुच्छ लेखणं हाच अजेंडा’

'तुकाराम मुंढे हिटलर, लोकप्रतिनिधींना तुच्छ लेखणं हाच अजेंडा'

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, नाशिक: नाशिक मनपाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे हिटलरशहा आहेत. लोकप्रतिनिधींचा अनादर करणे एव्हढाच त्यांचा अजेंडा आहे. परस्पर निर्णय घेणे, लोकप्रतिनिधींना न जुमानने अशी त्यांची कार्यशैली आहे, अशा शब्दात नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी हल्लाबोल केला. नाशिक मनपाचे आयुक्त आणि कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी 12 वर्षांच्या कारकीर्दीत अकराव्यांदा बदली झाली आहे. ते आता मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपद सांभाळतील.  नाशिकमधून बदली होताच तिथल्या लोकप्रतिनिधींनी तुकाराम मुंढेंवर तोफ डागण्यास सुरुवात केली.

आयुक्तांकडून तुच्छ वागणूक: आमदार सानप

आयुक्त तुकाराम मुंढेंनी मागच्या आयुक्तांचे निर्णय बदलले. लोकप्रतिनिधींना तुच्छ वागणूक दिली. फोन न उचलणे, विचारात न घेणे, आमदार निधीची कामे थांबवणे, असे अनेक प्रश्न आयुक्तांमुळे उपस्थित झाले होते. लोकप्रतिनिधींनी आयुक्तांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना  जुमानलं नाही, असा आरोप नाशिकमधील भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांनी केला.

इतकंच नाही तर आयुक्तांनी सर्व समित्या बासणात गुंडाळून ठेवल्याचं आमदार सानप म्हणाले.

आयुक्तांनी नगरसेवकांची कोणतीही कामे केली नाहीत. मुंडेनी फक्त मोठीच कामे केली. वारंवार विनंती करुनही आयुक्तांनी लोकप्रतिनिधींची कामे केली नाहीत. त्यामुळे पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांबाबत तक्रार केली. आयुक्त लोकप्रतिनीधींना मान सम्मान देत नाहीत, असंही आमदार सानप यांनी सांगितलं.

आयुक्त तुकाराम मुंढे जिथे जातील तेथे त्यांना शुभेच्छा. नवीन आयुक्तांसोबत शहर विकासाचं काम करु, असं बाळासाहेब सानप म्हणाले.

तुकाराम मुंंढेंची बदली

कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिवपदी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. याआधी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून मुंढेंची बदली करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, मुंढेंची बदली मंत्रालयात करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आता समोर आली आहे.

तुकाराम मुंढे यांना सरकारकडून बदलीचे आदेश प्राप्त झाले असून, नाशिक महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन पदाचा म्हणेच नियोजन विभागाच्या सहसचिवपदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे आदेशही मुंढेंना देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

उस्मानाबाद नव्हे, तुकाराम मुंढेंची ‘या’ ठिकाणी बदली!   

तुकाराम मुंढे आता होमग्राऊंडवर    

तुकाराम मुंढे यांची बदली, राधाकृष्ण गमे नाशिकचे आयुक्त    

तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 11 बदल्या, चूक एकच – ‘नियमाने काम’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI