मास्क न घालताच तुकाराम मुंढेंची डम्पिंग ग्राऊंडवर धाड, अधिकाऱ्यांना झाडलं!

कचरा गोळा करणारे कंत्राटदार कचऱ्याचं वजन जास्त दाखवून, महापालिकेकडून जास्त पैसे घेत असल्याचीही नागरिकांची तक्रार होती. त्यामुळे नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी कचरा डेपोवर धाड टाकली

मास्क न घालताच तुकाराम मुंढेंची डम्पिंग ग्राऊंडवर धाड, अधिकाऱ्यांना झाडलं!
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 1:52 PM

नागपूर : नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळीच डम्पिंग यार्डवर हजेरी लावत कचरा संकलन आणि त्यात होणाऱ्या अनियमिततेची माहिती (Tukaram Mundhe Nagpur Garbage Depot) घेतली. हजारो टन कचरा असलेल्या डेपोत जिथे मास्क घातल्याशिवाय कोणी जायला धजावत नाही, तिथल्या बऱ्यात कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांवर तुकाराम मुंढे मास्क न घालताच पोहोचले. अनियमिततेला जबाबदार अधिकाऱ्यांचा त्यांनी चांगलाच क्लास घेतला.

सकाळी 8:50 ची वेळ… नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे रविभवन परिसरातून निघाले. सकाळी 9:10 वाजता त्यांनी नागपूर शहरातील भांडेवाडी कचरा डेपोची पाहणी सुरु केली. शहरातील कचरा संकलनाबाबत अनेक जणांच्या तक्रारी होत्या. कचरा गोळा करणारे कंत्राटदार कचऱ्याचं वजन जास्त दाखवून, महापालिकेकडून जास्त पैसे घेत असल्याचीही नागरिकांची तक्रार होती. त्यामुळेच पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांतच कचरा डेपोवर धाड टाकली.

हेही वाचा : तुकाराम मुंढेंचे ‘छडी लागे छमछम’, कर्मचाऱ्यांसाठी सहा नियमांचं पत्रक

नागपूर शहरात सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी आहे. तरीही शहरातील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात अशाप्रकारचं प्लॅस्टिक आढळून आलं आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. एका महिन्यात सिंगल यूज प्लॅस्टिक उत्पादक, विक्रेते आणि वापरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले. शिवाय ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही, तर त्या घरमालकांवर दंड आकारुन त्यांचा कचरा न उचलण्याचा इशाराही तुकाराम मुंढे यांनी दिला.

भांडेवाडी डम्पिंग यार्ड…. या परिसरात जिकडे पहावं तिकडे कचऱ्याचे ढिग आहेत. दुर्गंधी आणि वायू प्रदुषणामुळे इथे मास्क न घालता येण्याची कुणी हिंमत करत नाही. पण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन डम्पिंग यार्ड परिसरात मास्क न घालत थेट पाहणी केली.

तुकाराम मुंढे यांनी दोन तासापेक्षा जास्त वेळ, भांडेवाडी कचरा डेपोची पाहणी केली. ज्या ठिकाणी अनियमितता दिसली तिथे कारवाईचे आदेश दिले. कचरा गोळा करणारे जे कंत्राटदार ओला, सुका कचरा वेगळा करत नाहीत, त्या कंत्राटदारांवर महिनाभरात कारवाई करण्याचे आदेश दिले.

तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे. लेटलतीफ कर्मचारी वेळेवर यायला लागले. अनेकांवर त्यांनी कारवाई केली. आता भांडेवाडी कचरा डेपोतील अनियमितताही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी आज दिला. त्यामुळे आता कंत्राटदारांचेही धाबे दणाणले (Tukaram Mundhe Nagpur Garbage Depot) आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.