Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा

Tv9 C Voter exit poll Maharashtra  : देशात कुणाचं सरकार येणार याचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईलच, पण त्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीत त्याबाबतचा अंदाज बांधता येईल. टीव्ही 9 मराठी आणि सी व्होटरचा सर्वात विश्वसनीय, सर्वात अचूक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. आज लोकसभेसाठी शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होत आहे, त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे […]

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

Tv9 C Voter exit poll Maharashtra  : देशात कुणाचं सरकार येणार याचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईलच, पण त्यापूर्वी मतदानोत्तर चाचणीत त्याबाबतचा अंदाज बांधता येईल. टीव्ही 9 मराठी आणि सी व्होटरचा सर्वात विश्वसनीय, सर्वात अचूक एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. आज लोकसभेसाठी शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यातील मतदान पूर्ण होत आहे, त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले.

टीव्ही 9 सी व्होटरच्या सर्वात विश्वसनीय एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. देशातील सर्वात विश्वसनीय एक्झिट पोल म्हणून याकडे पाहिलं जातं. यानुसार महाराष्ट्रात भाजपला 19, शिवसेनेला 15, काँग्रेस 8 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील असा अंदाज टीव्ही 9 सी व्होटरने व्यक्त केला आहे.  गेल्या म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 22 जागा होत्या यंदा त्यामध्ये 3 जागांची कपात होत आहे. तर शिवसेनेलाही 3 जागांचा फटका बसला आहे. सेनेच्या जागा 18 वरुन 15 वर आल्या आहेत. तर काँग्रेसच्या जागा चौपट वाढल्या आहेत. काँग्रेसला केवळ 2 जागा 2014 मध्ये होत्या त्या आता 8 वर पोहोचण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागाही 2 ने वाढण्याचा अंदाज असून, राष्ट्रवादी 4 जागांवरुन 6 जागांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

पक्षजागांचा अंदाज (महाराष्ट्र)
भाजप19
शिवसेना15
काँग्रेस8
राष्ट्रवादी6
एकूण48

Tv9 C Voter exit poll 2019 

?भाजप – 19 ?शिवसेना – 15 ?काँग्रेस – 8 ?राष्ट्रवादी -6

एकूण – 48

महाराष्ट्रातील 2014 चा लोकसभा निकाल

भाजप – 24 पैकी 23, शिवसेना 20 पैकी 18, राष्ट्रवादी – 21 पैकी 4, काँग्रेस 26 पैकी 2, स्वाभिमानी 2 पैकी 1 बहुजन विकास आघाडी 1 पैकी 0

देशात पुन्हा मोदी सरकार

Tv9 C voter exit poll एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत, पण 100 चा आकडा पार करणं कठीण आहे, असा अंदाज आहे.

Tv9 C voter exit poll एक्झिट पोलनुसार भाजपला एकूण 236 जागा मिळू शकतात. तर  मित्रपक्षांसह एनडीएच्या जागा 287 वर पोहोचतील असा अंदाज आहे.

गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने 282 जागा एकट्याने जिंकल्या होत्या, तर मित्रपक्षांच्या मिळून 336 जागांपर्यंत मजल मारली होती. यंदा मात्र भाजपला जागांचा फटका बसला आहे.

एग्झिट पोलभाजप + काँग्रेस +इतर
टीव्ही 9-सी व्होटर 287128127
टाईम्स नाऊ –VMR306132104
एबीपी-नेल्सन 267127148
न्यूज 24 – टुडेज चाणक्य34070133
न्यूज नेशन282-290111-126130-138
न्यूज 18- IPSOS 33682124
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 287128127
न्यूज एक्स242164136
रिपब्लिक – जन की बात 30512487

महाराष्ट्रात कुणी किती जागा दिल्या?

एग्झिट पोलभाजप+काँग्रेस+इतर
टीव्ही 9-सी व्होटर 341400
टाईम्स नाऊ –VMR381000
एबीपी-नेल्सन 341301
न्यूज 24 – टुडेज चाणक्य381000
न्यूज नेशन33-3513-1500
न्यूज 18- IPSOS 41-453-601
इंडिया न्यूज –पोल स्ट्रॅट 341400
न्यूज एक्स361101
रिपब्लिक – जन की बात 34-398-1201

संबंधित बातम्या 

TV9-C Voter Exit Poll LIVE : केंद्रात पुन्हा ‘मोदी सरकार’ 

Lok sabha Exit Polls 2019 : सर्व एक्झिट पोलचे आकडे एकाच ठिकाणी

Tv9 C voter exit poll :  महाराष्ट्रात काँग्रेसच्या जागा चौपट वाढणार

Tv9 C Voter exit poll Maharashtra : महाराष्ट्रात युतीला 34 जागा  

Tv9-C Voter Exit Poll : देशात मोदींना बहुमत, काँग्रेस 100 च्या आत!  

Tv9-C Voter Exit Poll : देशात पुन्हा मोदी सरकार येण्याची शक्यता – राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव  

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.