अटकेतील बांगलादेशी नागरिकांकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचा जन्माचा दाखला

विरारच्या अर्नाळा येथून 23 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. यांपैकी 2 बांगालादेशी नागरिकांकडे जन्माचा दाखला मिळाला आहे (Arrested Bangladesh Citizens have Birth Certificate).

अटकेतील बांगलादेशी नागरिकांकडे अर्नाळा ग्रामपंचायतीचा जन्माचा दाखला

पालघर : बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने 9 फेब्रुवारीला मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर पोलिसांनी मनसे कार्यककर्त्यांच्या मदतीने विरारच्या अर्नाळा येथून 23 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. यांपैकी 2 बांगालादेशी नागरिकांकडे जन्माचा दाखला मिळाला आहे. विशेष म्हणजे अर्नाळा ग्रामपंचायतीकडून त्यांना जन्माचा दाखला मिळाला असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे (Arrested Bangladesh Citizens have Birth Certificate).

पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक पथकाने ही कारवाई केली. मनसेच्या मोर्चानंतर 12 फेब्रुवारी रोजी अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीत घुसखोरांविरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 23 जणांना अटक करण्यात आली होती. यापैकी 2 बांगलादेशी नागरिकांकडे अर्नाळा ग्रामपंचायताचा जन्माचा दाखला असल्याचे पोलीस तपासात उघड झालं.

अटक करण्यात आलेल्या 23 जणांपैकी परविना अकरा गाजी आणि रफीकुल मेसार या दोघांकडे अर्नाळा ग्रामपंचायतीकडून मिळालेले जन्म दाखले आहेत. यातील परविना यांची जन्म तारीख 7 ऑगस्ट 1975 अशी आहे आणि त्यांना 16 जानेवारी 2008 रोजी जन्म दाखला देण्यात आला होता. त्यांच्या जन्मतारखेची नोंदणी 15 ऑगस्ट 1975 रोजी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक 01 आहे. तर राफीकुल यांचा जन्म 20 जून 1973 असून 25 ऑगस्ट 1973 रोजी त्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यांचा नोंदणी क्रमांक 11 आहे. अर्नाळा ग्रामपंचायतने त्यांना 29 जानेवारी 2007 रोजी जन्मदाखला दिला होता, असं तपासात समोर आलं आहे (Arrested Bangladesh Citizens have Birth Certificate).

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI