उदयनराजेंचं तळ्यात-मळ्यात सुरुच, आता शरद पवारांची भेट घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

उदयनराजेंचं तळ्यात-मळ्यात सुरुच, आता शरद पवारांची भेट घेणार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Sep 12, 2019 | 9:38 AM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यांनीही याबाबत निर्णय घेऊ, असे म्हणत आपल्या राजकीय वाटचालीचे संकेत दिले. यानंतर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह अनेकांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आज अखेर उदयनराजे आणि शरद पवार यांची भेट होत आहे. त्यामुळे आता या भेटीत काय चर्चा होणार? याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे.

उदयनराजे सकाळी 10 वाजता पुण्यातील मोतीबाग येथील शरद पवारांच्या घरी त्यांची भेट घेतील. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीनंतर उदयनराजेंचं मनपरिवर्तन होणार की ते भाजप प्रवेशाचा निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

राष्ट्रवादीचे मनधरणीचे प्रयत्न

उदयनराजेंनी पक्ष सोडू नये यासाठी राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. फक्त साताऱ्यातच नव्हे, तर राज्यभरात उदयनराजेंचा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला फायदा होईल. यासाठी राष्ट्रवादी विविध माध्यमातून उदयनराजेंची मनधरणी करत आहे.

याआधी उदयनराजे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही प्रयत्न केले होते. मात्र, त्यात यश आलं नाही. आता पुन्हा उदयनराजे शरद पवार यांच्या भेटीला जात असल्यानं त्यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप प्रवेश लांबणीवर

दुसरीकडे उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडल्याचीही चर्चा आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 2 तास चर्चा केली होती. पण उदयनराजेंच्या काही अटींवर ठोस निर्णय होऊ शकला नाही. विशेष म्हणजे उदयनराजेंनी सोमवारी (9 सप्टेंबर) कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मंगळवारी (10 सप्टेंबर) लगेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

उदयनराजेंच्या अटी काय?

सूत्रांच्या माहितीनुसार भाजप प्रवेशासाठी उदयनराजेंच्या काही अटी ठेवल्या आहेत. त्याखालीलप्रमाणे,

  1. सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी
  2. पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें