थांब म्हटलं असतं तर थांबलो असतो, पण… : उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी सोडताना मला कोणी थांब म्हटलं असतं, तर मी थांबलो असतो. पण मला माहीत आहे ते तसं म्हणणार नाहीत," अशी टीका राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी केली.

थांब म्हटलं असतं तर थांबलो असतो, पण... : उदयनराजे भोसले

सातारा : “राष्ट्रवादी सोडताना मला कोणी थांब म्हटलं असतं, तर मी थांबलो असतो. पण मला माहीत आहे ते तसं म्हणणार नाहीत,” अशी टोला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांनी लगावला. भाजपमध्ये गेल्यानंतर महाजनादेश यात्रेनिमित्त उदयनराजेंनी (Udyanraje Bhosale Speech Satara) साताऱ्यातील जनतेशी संवाद साधला. “मी एक, दोन नाही तर माझ्या आयुष्यातील 15 वर्षे घालवली. लोकांना वेगवेगळी पद मिळाली, पण मी काहीही न घेता काम केलं. सत्ता असताना मी कोणतीही फाईल किंवा जनहिताचे काम घेऊन गेलो, तर त्यावर फुल्ली असायची. ती थेट कचऱ्याच्या डब्ब्यात जायची”, अशी टीका उदयनराजेंनी (Udyanraje Bhosale Speech Satara) राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.

मी दरवेळेला निवडून आल्यानंतर माझं मताधिक्य वाढलेले असायचं. मात्र यंदाच्या निवडणुकीत ते घटलेले दिसलं. त्यामुळे मी नैतिकरित्या हरलो आणि मध्यरात्री मी हा निर्णय घेतला. मी दरवेळी म्हणतो, “एक बार जो मैने कमेटमेंट कर दी तो, मै अपने आप की नही सुनता. पण येथे माझी निराशा होत होती” असेही उदयनराजे म्हणाले.

“मी माझं काम केलं नाही, राष्ट्रवादीने मला सहनशीलतेचा एक पुरस्कार तरी द्यायला हवा होता. मी नेहमी जनतेला मानले असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारावे ही मागणी होत होती. तेव्हा मुख्यमंत्री होते, मात्र ही काम होत नव्हती. मात्र आता तीच काम होत आहे”, अशी टीकाही त्यांनी (Udyanraje Bhosale Speech Satara) राष्ट्रवादीवर केली.

मी जेव्हा कृषी महाविद्यालय आणि आयआयटी महाविद्यालय उभारायचे आहे असे सांगितले. तेव्हा त्यांनी मला जिल्ह्यात जागा नसल्याचं सांगितले. त्यावेळी त्यांच्या पेनमध्ये शाई संपली असं मला वाटलं. त्यामुळे मी त्यांना सही करण्यासाठी पेन घेऊन गेलो. त्यांनी पेन खिशात ठेवला, माञ सही केली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

“मी भाजप मध्ये गेल्यानंतर कोणी माझा बँड वाजवायचा ठरवत असेल, पण माझा बँड फक्त मीच वाजवतो हे लक्षात असू द्या, मीही बँड मास्तर आहे. पूर्वी मलाही वाटतं होत की सगळं मतदान आता तिकडे का जाते. पण ईव्हीएमच्या मुद्द्यावर बोलताना लोकं कामाकडे बघून मतदान करतात. ही कामं पूर्ण करणारी लोक आहेत. त्यामुळे कामाला लावणाऱ्यांवर निर्णय काय घ्यायचा. त्यांना कामाला लावलं नाहीतर ते तुम्हाला कामाला लावतील. त्यांच्या या कामामुळे मला ईव्हीएमवर उत्तर मिळालं, असेही उदयनराजे (Udyanraje Bhosale Speech Satara) यावेळी म्हणाले”

भाजपची स्तुती

“भाजप सरकारने पैसे दिल्याने सातारा शहरातील पुढील 50 वर्षांसाठी पाण्याच प्रश्न मिटला. तसेच पर्यटनचाही विकास झाल्याने पर्यटकही साताऱ्याकडे वळू लागले,” अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारची स्तुती केली.

सातारा एमआयडीसी आणि नगर एमआयडीसी एकाच वेळी झाली. नगरच्या एमआयडीसीचा विकास झाला, मात्र साताऱ्यात विकास झाला नाही. अशी खंतही त्यांनी यावेळी उपस्थितीत केली. भाजप सरकारने आयटी पार्कसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अवस्था तुकड्यांसारखी

शिवेंद्रराजे भाजपात हे मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी गेले हे म्हणणे चुकीचे आहे. मला जर असं कोण म्हणालं असतं. तर मी त्यांना सांगेन की, सद्यस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची अवस्था तुकड्यासारखी झाली आहे. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षा आणि आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी राष्ट्रवादीला दिला.

“दुसऱ्या पक्षाची यात्रा पाहतो, आपली काय परिस्थिती आहे हे सारखं सारखं सांगत आपण लोकांना फसवू शकतं नाही. त्यामुळे फसवेगिरी उघड झाली आहे. दरम्यान येत्या पाच वर्षात साताऱ्यात जिल्ह्यात मोठी विकास कामं होणार आहे”, असेही उदयनराजे आत्मविश्वासाने म्हणाले.


Published On - 8:30 pm, Sun, 15 September 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI