अमेरिका-इराण तणाव शिगेला, तेहरानजवळ विमान कोसळून 176 प्रवाशांचा मृत्यू

इराणची राजधानी तेहरानमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. तेहरानवरुन उड्डाण केलेलं एक यूक्रेनिअन एअरलाइन्सचं विमान कोसळलं (Ukrainian plane crashes in tehran).

अमेरिका-इराण तणाव शिगेला, तेहरानजवळ विमान कोसळून 176 प्रवाशांचा मृत्यू

तेहरान : इराणची राजधानी तेहरानमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. तेहरानवरुन उड्डाण केलेलं एक युक्रेनिअन एअरलाईन्सचं विमान कोसळलं (Ukrainian plane crashes in tehran). या अपघातात विमानातील सर्व 176 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातग्रस्त विमान युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचं असून PS752 B737 असा या विमानाचा नंबर आहे.

इराणमधील वृत्तसंस्थेने तांत्रिक अडचणी आल्यानं हे विमान कोसळल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे अल हदथ या स्थानिक न्‍यूज एजन्सीने रॉकेटविरोधी गनकडून चुकीने पाडल्याचा दावा करण्यात आला. इराण आणि अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव तयार झालेला असताना हा अपघात झाला. यात 176 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. इराण किंवा युक्रेनियाकडून याबाबत मृतांचा अधिकृत आकड्याची घोषणा होणे बाकी आहे. विमान कोसळ्यानंतर विमानाला आग लागली. ही आग नियंत्रणात आणून प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्नही करण्यात आले.


सोमवारी (6 जानेवारी) सकाळी इराणने इराकमधील अमेरिकी सैन्याच्या दोन तळांवर हल्ला केला. त्यानंतर अमेरिका देखील हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराण आणि अमेरिकेमधील तणाव जसजसा वाढत आहे तसतशी कच्चा तेलाची किमतही वाढत आहे. ब्रेंट क्रूडचा दर 71 डॉलर पार गेला आहे. सातत्याने होणाऱ्या दरवाढीनंतर मागील आठवड्यात तेलाच्या दरात काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, इराण आणि अमेरिका संघर्षाने तेलाचे दर आता पुन्हा वेगाने वाढत आहेत.

संबंधित बातम्या :

इराणचं अमेरिकेला प्रत्युत्तर, अमेरिकेच्या इराकमधील दोन सैन्य ठिकाणांवर हल्ला

आखाती देशात युद्धाची शक्यता, इराणमध्ये मशिदीवर लाल झेंडा, अमेरिकेचं ड्रोनही पाडलं

जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट, युद्ध झालंच तर ‘हे’ देश येणार समोरासमोर

अमेरिकेच्या नाकी नऊ आणणारे इराणचे जनरल कासिम सुलेमानी ठार, अमेरिकेचं ‘सर्जिकल स्ट्राईक’


Published On - 10:30 am, Wed, 8 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI